Type Here to Get Search Results !

मुरुडच्या वसंतराव नाईक महाविद्यालयात राष्ट्रीय जंतनाशक दिन

 मुरुडच्या वसंतराव नाईक महाविद्यालयात राष्ट्रीय जंतनाशक दिन 


कोर्लई,ता.४(राजीव नेवासेकर) मुरुडच्या वसंतराव नाईक महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेतर्फे प्राचार्य डॉ.जे.के.कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय जंतनाशक दिन साजरा करण्यात आला.

     यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जे.के.कांबळे, ग्रामीण रुग्णालयाच्या आरोग्य सेविका दक्षता चोगले, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.एस.एस.भैरगुंडे,प्रा.डॉ.जी.डी.मुनेश्वर, विद्यार्थी उपस्थित होते.

  शासनाच्या आरोग्य विभागातर्फे राष्ट्रीय जंतनाशक दिन साजरा करण्यात येतो.बालवयापासून शरिरात जंत होण्याची समस्या जटिल असून याचा शारीरिक, मानसिक वाढीवर परिणाम होऊन पोटात दुखणे, भूक मंदावणे, मळमळ होणे असे विकार होऊन वजन देखील घटते.यावर उपाय जंतनाशक गोळी घेतल्याने रक्ताशय रोखला जाऊन अन्न पचन व रक्तवाढीस मदत होते.असे आरोग्य सेविका दक्षता चोगले यांनी सांगितले.यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना जंतनाशक गोळीचे वाटप करण्यात आले.

    कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचलन प्रा.डॉ. जी.डी. मुनेश्वर तर प्रा.डॉ.एस.एस.भैरगुंडे यांनी आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad

फॉलोअर