हिंदी व गणित विषयांकरिता मासिका तत्वावर सहाय्यक शिक्षक पदासाठी पात्र व इच्छूक उमेदवारांनी अर्ज सादर करावेत,
रायगड,दि.12(जिमाका):- सामाजिक न्याय विभागांतर्गत रायगड जिल्ह्यात सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाच्या अधिनस्त अनुसूचित जाती/नवबौध्द मुलांकरिता शासकीय निवासीशाळा, जावळी, ता.माणगांव येथे शासकीय निवासी शाळा कार्यान्वीत आहे. येथे इयत्ता 6 वी ते 10 वी साठी तात्पुरत्या स्वरुपात मासिका तत्वावर 6 महिने किंवा नियमित शिक्षक हजर होईपर्यंत हिंदी व गणित विषयांकरिता मासिक तत्वावर सहाय्यक Application Teacherसाठी पात्र व इच्छूक उमेदवारांनी (बायोडाटा, रिजूम) आवश्यक शैक्षणिक अर्हताचे कागदपत्रांसह अर्ज सादर करावेत, असे आवाहन सहायक आयुक्त, समाज कल्याण समाधान इंगळे यांनी केले आहे.
याकरिता सहाय्यक शिक्षक (मासिक तत्वावर) शैक्षणिक पात्रता-BA.B.Ed, विषय-हिंदी, आवश्यक पद संख्या 01सहाय्यक शिक्षक (मासिका तत्वावर), शैक्षणिक पात्रता-B.Sc. B.Ed, विषय-गणित, आवश्यक पद संख्या 01.
यासाठी अटी व शर्ती पुढीलप्रमाणे : सदर पदावर घडयाळी तासाप्रमाणे शालेय शिक्षण व क्रिडा विभागाच्या मंजूर दरानुसार मानधन देय राहील. एकत्रित मानधना व्यतिरिक्त इतर कोणतेही भत्ते देय राहणार नाही. उमेदवारांची निवड करताना अनुभव तसेच TET परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांना प्रधान्य देण्यात येईल. शैक्षणिक पात्रता,अनुभव इ.अहर्ता किमान असून,किमान अर्हता धारण केली म्हणून उमेदवार मुलाखतीस बोलविण्याकरिता पात्र असणार नाही. सेवा प्रवेश नियम आणि शासनाकडून तदनंतर वेळोवेळी करण्यात आलेल्या सुधारणा तसेच कार्यनियमावलीतील तरतुदींनुसार भरती प्रक्रिया राबविण्यात येईल. सदर पदे मानधन/तासिका तत्वावर असून,भरती प्रक्रियेचे संपूर्ण अधिकार,पदे कमी जास्ती करणे,भरती प्रक्रिया कोणत्याही टप्प्यावर रद्द करणे अटी व शर्तीमध्ये बदल करणे ,सदरील पदे कधीही कोणताही कारण न देता समाप्त करण्याचे अधिकार सहाय्यक आयुक्त समाज कल्याण रायगड,अलिबागयांनी राखून ठेवलेले आहेत.
पात्र व इछुक उमेदवारांनी आपला अर्ज जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे अनुसूचित जाती/नवबौध्द मुलांकरिता शासकीय निवासी शाळा, जावळी, ता.माणगांव येथे लवकरात लवकर सादर करावेत.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या