Type Here to Get Search Results !

सिल्व्हर जुबली राज्यस्तरीय सिकई स्पर्धेत रायगडच्या खेळाडूंची चमकदार कामगिरी ! १३ सुवर्ण व २ रजत पदक पटकावले




कोर्लई,ता.१(राजीव नेवासेकर)वर्धा -सानेवाडी येथे सिल्व्हर जुबली २५ व्या झालेल्या राज्यस्तरीय सिकई मार्शल आर्ट स्पर्धेत दि रायगड डिस्ट्रिक्ट सिकई मार्शल आर्टच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत १३ सुवर्ण व २ रजत पदके पटकावल्याने सर्वत्र कौतुक व अभिनंदन केले जात आहे. 

   सिकई असोसिएशन ऑफ महाराष्ट्र व वर्धा जिल्हा सिकई  असोसिएशनच्या संयुक्तविद्यमाने दिनांक २९ नोव्हेंबर ते १ डिसेंबर दरम्यान २५ व्या रौप्यमहोत्सवी राज्यस्तरीय सिकई मार्शल आर्ट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.यामध्ये दि रायगड डिस्ट्रिक्ट सिकई मार्शल आर्टच्या खेळाडूंनी  चमकदार कामगिरी करत तेरा सुवर्ण दोन रजत, अशा एकुण १५ पदके पटकावून चमकदार कामगिरी केली. 

    नांदगाव येथील प्रसिद्ध कराटे मास्टर विजय चंद्रकांत तांबडकर (९वी डिग्री ICS) यांच्या मार्गदर्शनाखाली सहभागी झालेल्या रायगड जिल्हा संघात सुवर्णपदक पटकावणाऱ्या खेळाडूंमध्ये आकांक्षा विजय तांबडकर (नांदगाव) , अमोघ समित दळवी (नांदगाव), ध्रुव शिल्पा कळके, (मजगाव),  रेश्मा मंगेश भोईर (मजगाव) , काव्या केतन नाक्ती (खार मजगाव), देवदत्त मनिष पडवळ (अलिबाग),  रुग्वेद विकास नाईक(अलिबाग), वेदांत संदेश सुर्वे (अलिबाग),  शुभम महेंद्र नखाते (अलिबाग), शिव देवजी हिलम (अलिबाग), या खेळाडूंचा समावेश असून अथर्व स्वप्निल गद्रे (नांदगाव), रजत पदकांचा मानकरी ठरला आहे !

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad

फॉलोअर