मुरुडच्या वसंतराव नाईक महाविद्यालयात जागतिक एड्स दिन साजरा
![]() |
Raigad Maza News |
ग्रामीण रुग्णालयाच्या समुपदेशक पूजा तोंडले, नगरपरिषद कर्मचारी जयेश चोडणेकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जे.के.कांबळे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.एस.एस.भैरगुंडे,प्रा.डॉ.जी.डी.मुनेश्वर,प्रा.डॉ.एन.एन.बागूल, महाविद्यालयांतील विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.सुरुवातीला सर्व उपस्थितांचे स्वागत करण्यात येऊन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.
यावेळी ग्रामीण रुग्णालयाच्या समुपदेशक पूजा तोंडले यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना एच आय व्ही(एड्स) बाबत अत्यंत उपयुक्त माहिती दिली.हा आजार बाधित किंवा एका पेक्षा जास्त व्यक्ती सोबत असुरक्षित शारिरिक संबंध ठेवल्याने,बाधित सुई किंवा इंजेक्शन,बाधित व्यक्ती चे रक्त व रक्तघटक घेतल्याने,आणि संसर्गित आईवडीलापासून त्यांच्या होणाऱ्या बाळाला,या चार कारणातूनच हा आजार होत असल्याचे सांगितले. अशक्तपणा, थकवा, अंगावर पुरळ किंवा नागीण येणे, रोज रात्री हलकासा ताप, खोकला वगैरे ही लक्षणे या आजाराची असून, अशी काही लक्षणे आढळल्यास जवळच्या शासकीय रुग्णालयात जाऊन आपली एच आय व्ही तपासणी मोफत करून घ्यावी. असे सांगितले. एकमेकांसोबत राहिल्याने, एकमेकांचे कपडे, अंथरून पांघरून वापरल्याने,एकच संडास किंवा भांडे वापरल्यामुळे हा आजार होत नाही, त्यामुळेच बाधित व्यक्तीला आपल्यापासून दूर करू नका, त्याला प्रेम,माया द्या, त्याला समाजात सन्मानाने जगू द्या, असे सांगितले.हा आजार होऊ नये म्हणून असुरक्षित शारीरिक संबंध टाळावे, नेहमी कंडोमचा वापर करावा, रक्त किंवा रक्तघटक घेताना ते शासकीय रक्त पेढीतूनच किंवा योग्य तपासणी करूनच रक्त घ्यावे, आईवडिलांना असेल तर त्यांना वेळी च योग्य औषधोपचार चालू करून त्यांच्या होणाऱ्या बाळाला या आजारापासून वाचवण्याचे प्रयत्न करावे,तसेच या आजारांवर आजपर्यंत कुठलीही लस किंवा औषध उपलब्ध नसून ए आर टी औषधोपचार घेतल्यास रुग्ण चांगल्या प्रकारे आपले जीवनमान जगू शकतो.महाविद्यालयीन युवकांनी जास्तीत जास्त संख्येने आपली एच आय व्ही तपासणी करून घ्यावी, लग्नाअगोदर मुलगा किंवा मुलगी दोघांनी मिळून एच आय व्ही तपासणी करून घ्यावी,व या आजाराला निर्बंध घालावा, असे प्रतिपादन केले तसेच प्राचार्य डॉ.जे.के.कांबळे, जयेश चोडणेकर यांनी एड्स रोगा बाबत मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे औचित्य साधून यावेळी एड्स रोगा बाबत पोष्टर स्पर्धा घेण्यात आल्या.प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा.डॉ.जी.डी.मुनेश्वर यांनी तर आभार अनुष्का चव्हाण यांनी मानले.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या