काशीद समुद्रात बुडून पुण्याच्या पर्यटकाचा मृत्यू deth
कोर्लई,ता.२८(राजीव नेवासेकर)मुरुड तालुक्यातील काशीद समुद्रात बुडून पुणे जिल्ह्यातील एका पर्यटकाचा मृत्यू झाला. शुक्रवारी दि. २७डिसेंबर रोजी सकाळी १२ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली, धर्मेश देशमुख (वय-५७) असे त्यांचे नाव आहे.
पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील पिसोली येथील महात्मा जोतिराव फुले हायस्कूलचे मुख्यध्यापक आणि शिक्षक असे आठ ते दहा जण मुरुड तालुक्यातील काशीद समुद्रकिनारी पर्यटनास आले होते. मुख्याध्यापक धर्मेश देशमुख हे समुद्रात स्नानासाठी शिक्षकांसह उतरले होते. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुड्डू लागले. त्यावेळी समुद्रकिनारी असलेल्या जीवरक्षकांनी त्यांना बाहेर काढले. धर्मेश देशमुख यांना बोर्ली व रेवदंडा येथील आरोग्य केंद्रात नेण्यात आले. त्यानंतर अलिबाग जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. त्यावेळी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित करण्यात आले. जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर त्याचा मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या