महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुरुड तालुक्यात बौद्ध समाजाच्यावतीने महामानवाला विनम्र अभिवादन !
![]() |
Mahaparinirvan Din 2024 |
कोर्लई,ता.७(राजीव नेवासेकर) भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न Dr.Babasaheb Ambedkarrयांच्या ६८ व्या. महापरिनिर्वाण दिनी मुरुड तालुका बौद्ध समाज सेवा संघ ( रजि.) तालुक्यातील २२ गावांमध्ये सर्व गावातील महिला,समाज बांधवांनी बुद्ध विहारात जाऊन विनम्र अभिवादन करण्यात आले !
बौद्ध समाज सेवा संघ केंद्रीय समितीचे विद्यमान अध्यक्ष आयु.किशोरजी शिंदे यांनी स्वतः दादर चैत्यभूमी येथे जाऊन डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. तालुक्यातील आंबोली गावातील समता सैनिक दलातील युवा भीम सैनिकांनी आपले कर्तव्य बजावत चैत्यभूमी ठिकाणी हजेरी लावली.
विभागीय शाखा क्र.१चे विद्यमान अध्यक्ष आयु.नितीन गायकवाड( आगरदांडा),शाखा क्र.२ चे विद्यमान अध्यक्ष आयु .नरेंद्र जाधव( मजगांव) तसेच शाखा क्र.३ चे विद्यमान अध्यक्ष आयु.जनार्धन शिंदे ( तळेखार)यांनी देखील त्याच्या गावातील बुद्ध विहारामध्ये जाऊन Dr.Babasaheb Ambedkarयांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. मुरुड तालुका डॉ.आंबेडकर स्मारक समितीचे विद्यमान अध्यक्ष आयु.मनोहर तांबे व सचिव आयु.मंगेश येलवे हे देखील 'दादर चैत्याभूमी' वर जाऊन बाबासाहेब आंबेडकर यांना नतमस्तक झाले,त्याचं प्रमाणे धम्म संस्कार समितीचे अध्यक्ष आयु.सुभाष मोरे व सचिव आयु.प्रकाश सोरे यांनी देखील चैत्यभूमी दादर येथे मुरुड तालुका बौद्ब समाज सेवा संघ( Reg.)यांच्या वतीने डॉबाबासाहेब आंबेडकर यांना विधी घेऊन मानवंदना देण्यात आली.त्याचं प्रमाणे तालुक्यातील बौद्ब बंधू व भगिनी यांनी आपापल्या परीने दादर चैत्यभूमी येथे जाऊन डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले असल्याची माहिती स्थानिक तालुका समितीचे विद्यमान अध्यक्ष आयु.सुरेश मोरे (मांडला)
व सचिव आयु.धर्मेश मोरे( आंबोली) यांनी दिली .
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या