Type Here to Get Search Results !

निवडणूक आचारसंहिता भंगाच्या तक्रारीसाठी टोल फ्री क्रमांक Toll free Contact










रायगड दि. 12(जिमाका ):- विधानसभा  निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता भंगाच्या तक्रारीसाठी जिल्हा निवडणूक प्रशासनातर्फे टोल फ्री संपर्क क्रमांक  उपलब्ध करुन देण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी श्री. किशन जावळे यांनी दिली.

भारत निवडणूक आयोगाने विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून निवडणूक आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी तात्काळ सुरू झाली आहे. नागरिकांना आचारसंहिता भंगाच्या तक्रारी करावयाच्या असल्यास त्यांनी 02141-222118 आणि 1950 टोल फ्री क्रमांकावर नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा.

या कक्षाद्वारे तातडीने तक्रारीची दखल घेण्यात येईल. हा कक्ष २४ तास सुरू राहणार असून त्यासाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नियंत्रण कक्षाला आलेल्या तक्रारीनुसार भरारी पथके आवश्यक कारवाई करतील, असेही जिल्हा निवडणूक अधिकारी श्री जावळे यांनी स्पष्ट केले आहे.

निवडणूक आयोगामार्फत cVIGIL ॲपचीही सुविधा  उपलब्ध करून देण्यात आली आहे. कोणत्याही सामान्य नागरिकाला जर निवडणुकीत काही अफरातफर दिसून आली तर या ॲपवर जाऊन त्याची माहिती द्यायची आहे. फोटो अपलोड करण्याचीही सुविधा आहे. ज्या व्यक्तीने तक्रार दाखल केली. त्याच्या लोकेशनवरून निवडणूक आयोगा सदर परिसराचा माग काढेल आणि 100  मिनिटांच्या आत आयोगाचे पथक त्याठिकाणी दाखल होईल.आवश्यक ती कार्यवाही करेल अशी माहिती श्री.जावळे यांनी दिली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad

फॉलोअर