Type Here to Get Search Results !

पनवेल विधानसभा मतदारसंघात 137 मतदारांनी बजावला गृह मतदानाचा हक्क


रायगड (जिमाका) दि.12 :- भारत निवडणूक आयोगाने 85 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या आणि 40 टक्क्यांपेक्षा जास्त अपंगत्व प्रमाणपत्र असलेल्या नागरिकांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी घरबसल्या मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. 188-पनवेल विधानसभा मतदारसंघात आज 137 मतदारांनी गृह मतदानाचा हक्क बजावला, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी पनवेल पवन चांडक यांनी दिली. मतदारसंघातील रहिवासी 85 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या 124 ज्येष्ठ नागरिकांनी, 13 दिव्यांग मतदार यांनी घरबसल्या मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. गोपनीय पद्धतीने मतदान करण्याची सुविधा पुरविण्यात येऊन संबधित विधानसभा मतदारसंघाचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली नियुक्त करण्यात आलेल्या क्षेत्रीय अधिकारी, मतदान अधिकारी तसेच मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांनी गृह मतदान प्रक्रियेत सहभाग घेतला. यावेळी ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग मतदारांनी निवडणूक आयोगाचे आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad

फॉलोअर