प्रथम भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष शैलेश काते यांनी आज २६ नोव्हेंबर संविधान दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देऊन भारताचे संविधान पुस्तिका अधिकारी,कर्मचारी यांना देण्याचे आयोजन करण्यात आले असल्याचे प्रतिपादन केले.
यावेळी तहसिलदार रोहन शिंदे, नायब तहसीलदार संजय तवर, नायब तहसिलदार राजश्री साळवी, पंचायत समिती मुरूड गटविकास अधिकारी राजेंद्र कुमार खटाळ, सेवानिवृत्त तहसिलदार नयन कर्णिक यांना भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष शैलेश काते, उपाध्यक्ष गणेश कट,युवा शहर प्रमुख महेश मानकर,तालुका सरचिटणीस संदिप चिरायू, युवा मोर्चा अध्यक्ष प्रशांत भोय, ज्येष्ठ पदाधिकारी उदय सबनीस यांच्या हस्ते शासकिय अधिकारी, कर्मचारी यांना भारतीय संविधानाची पुस्तिका भेट देऊन २६ नोव्हेंबर भारतीय संविधान दिन साजरा करण्यात आला.महेश मानकर यांनी आभार मानले.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या