रायगड (जिमाका)दि.२८:- मा. पंतप्रधान महोदयांनी सन २०२५ ला भारत देश क्षयरोग मुक्त करण्याचे ध्येय ठेवलेले आहे जे की शाश्वत विकास ध्येयाच्या अपेक्षित कालावधीपेक्षा ५ वर्ष अगोदर आहे. याकरीता मा.पंतप्रधान महोदयांनी दि. २४ मार्च २०२३ रोजी क्षयरोग मुक्त पंचायत हा अभिनव उपक्रम सुरु केला असून याद्वारे पंचायत राज संस्थांना सक्षम करुन क्षयरोगाशी निगडीत समस्यांचे निराकरण करुन क्षयरोग दुरीकरणासाठी ग्रामपंचायतीमध्ये निरोगी स्पर्धा निर्माण करुन त्यांच्या योगदानाचे जाहीर कौतुक करून ग्रामीण भागातील समाज क्षयरोग मुक्त करणे हा या उपक्रमाचा उद्देश असल्याची माहिती जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.सचिन जाधव यांनी दिली आहे.
या अभियानांतर्गत गावपातळीवरील आरोग्य उपकेंद्र, आरोग्यवर्धिनी केंद्राचे अधिकारी, कर्मचारी, ग्रामपंचायतीच्या सहकार्याने क्षयरोग दुरीकरणासाठी सातत्याने प्रयत्न करत आहेत. तसेच दि.०८ जुलै २०२२ रोजी पंचायतराज मंत्रालय, भारत सरकारने आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय, भारत सरकार सोबत टिबी मुक्त पंचायतसाठी सामंजस्य करार केलेला आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड जिल्ह्यामध्ये क्षयरोग मुक्त पंचायत हा कार्यक्रम सन २०२३ पासून राबविला जात आहे. सन २०२३ मध्ये रायगड जिल्ह्यातील ९० ग्रामपंचायतींना क्षयरोग मुक्त ग्रामपंचायत म्हणून घोषित करण्यात आले आहे. सदर ९० क्षयरोग मुक्त ग्रामपंचायतीना महात्मा गांधीजींचा पुतळा व जिल्हाधिकारी, रायगड यांच्या स्वाक्षरीचे प्रमाणपत्र देऊन गौरविण्यांत आले. सन २०२४ या वर्षामध्ये जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये क्षयरोग मुक्त ग्रामपंचायत उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे.
सन २०२४ या वर्षामध्ये जिल्ह्यातील ५० टक्के ग्रामपंचायती क्षयरोग मुक्त करण्याकरीता मुख्य कार्यकारी अधिकारी, डॉ. भरत बास्टेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा क्षयरोग विभाग प्रयत्नशील आहे. हा उपक्रम यशस्वी होण्याकरीता गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य कर्मचारी, आशा व राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्ग कर्मचारी इ. सर्व केडरना मार्गदर्शन करून त्यांचा सहभाग घेण्यात येत आहे. याकरीता जिल्हास्तरावर, तालुकास्तरावर विविध कार्यशाळांचेही आयोजन करण्यात आले आहे. तसेच रायगड मेडीकल असोसिएशन ही या उपक्रमाकरीता मदत करत आहे.
क्षयरोग निदानाकरीता रायगड जिल्हयातील प्रत्येक तालुक्यामध्ये नॅट Molecular Diagnostic Facility सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तसेच ६२ सुक्ष्मदर्शी तपासणी केंद्रामार्फतही क्षयरुग्ण तपासणी करण्यात येत आहे.तसेच एमजीएम वैद्यकीय महाविद्यालय व हॉस्पिटल, कामोठे, ता. पनवेल येथे फुप्फुसेत्तर (Extra Pulmonary) रुग्णांकरीता निदान सुविधा व Multi Drugs Resistant रुग्णांकरीता सर्व सुविधा मोफत उपलब्ध करुन देण्यांत आल्या आहेत. क्षयरुग्णांकरीता सर्व निदान सुविधा व औषधोपचार सर्व शासकीय आरोग्य संस्थांमध्ये मोफत दिला जातो
जिल्ह्यातीलसर्व खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांचीही राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमात मदत घेतली जात आहे. विविध औद्योगिक कंपन्यांनीही त्यांच्या CSR फंडामधून मोठे योगदान दिलेले आहे.खालापूर, खोपोली, रसायनी, रोहा, माणगाव, महाड, नागोठणे, अलिबाग या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर औद्योगिक कारखाने असून औद्योगिक कंपन्यांमध्ये कामगार संघटनांकडून आपल्या विविध मागण्यांसाठी अचानक संप व आंदोलन पुकारण्यात येत असतात. त्यामुळे अनेक वेळा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असतो. रायगड जिल्ह्यामध्ये बहुतांशी गांवामध्ये हिंदु-मुस्लिम बौध्द तसेच इतर धर्मीयांची मिश्रवस्ती असल्याने अधून मधून वैयक्तिक कारणांमुळे पोलीस ठाण्यांच्या हद्दीमध्ये हिंदु-मुस्लिम व्यक्तीमध्ये जातीय तणावाच्या घडना घडून दखलपात्र व अदखलपात्र गुन्हे घडण्याच्या घटना घडत असतात. त्यामुळे देखील हिंदु-मुस्लिम जातीय तणावाची परिस्थिती निर्माण होत आहे. रायगड जिल्हा पोलीस कार्यक्षेत्रातील विधानसभा निवडणूक प्रक्रिया नुकतीच पार पडली आहे. निवडणूकीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी रायगड यांच्याकडील दि.१५ ऑक्टोबर २०२४ रोजीच्या पत्रान्वये सर्व सार्वजनिक ठिकाणी आंदोलने, मोर्चा, धरणे आंदोलन करण्यास प्रतिबंध करण्याबाबत आदेश पारित केलेले होते.
रायगड जिल्हा पोलीस कार्यक्षेत्रात अचानकपणे आंदोलने, मोर्चा, धरणे आंदोलने, उपोषणे होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सर्व परिस्थिती तसेच विधानसभा निवडणूक २०२४ ची आदर्श आचारसंहिता लक्षात घेता, नमूद औद्योगिक क्षेत्रात शांतता प्रस्थापित राहावी. तसेच सण उत्सव व राजकीय परिस्थिती आंदोलन/उपोषण व आत्मदहनाच्या वेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये या दृष्टीकोनातून रायगड जिल्हा पोलीस कार्यक्षेत्राच्या हद्दीत दि.२७ नोव्हेंबर २०२४ रोजी ००.०१ वा. ते दि.११ डिसेंबर २०२४ रोजीचे २४.०० वाजेपर्यत या कालावधीकरीता मुंबई पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम ३७ (१) मधील (अ), (ब), (क), (ड), (ई) व (फ) प्रमाणे अपर जिल्हादंडाधिकारी संदेश शिर्के यांनी खालील कृत्ये करण्यास मनाई आदेश जारी केला
शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, बंदूका, सुरे काठया किंवा लाठ्या अगर शारिरीक दुखापत करण्यासाठी वापरात येईल अशी कोणतीही तत्सम वस्तू बाळगणे. अंग भाजून टाकणारा पदार्थ किंवा कोणताही स्फोटक पदार्थ घेऊन फिरणे. दगड किंवा क्षेपणास्त्रे सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे किवा साधने बाळगणे, जमा करणे किंवा तयार करणे. व्यक्ती, प्रेत, आकृत्या यांच्या प्रतिमांचे प्रदर्शन करणे. सार्वजनिक रितीने आक्षेपार्ह घोषणा देणे किंवा गाणे म्हणणे किंवा वाजविणे. सभ्यता अगर निती याविरुध्द असतील अशी जिल्हयाची शांतता धोक्यात आणतील किंवा ज्यामुळे राज्य शासन उलथून पाडण्याचा संभव आहे अशी आवेशपूर्ण भाषणे किंवा हावभाव करणे किंवा सोंग करणे, चित्र, चिन्हे अगर कोणतीही तत्सम वस्तू, जिन्नस तयार करणे किंवा लोकांत प्रसार करणे.रायगड जिल्हा पोलीस कार्यक्षेत्राच्या हद्दीत पूर्व परवानगीशिवाय पाच अगर पाचाहून अधिक व्यक्तींचा समावेश असलेल्या कोणत्याही जमावास किंवा मिरवणूकीस मनाई राहील.
तसेच सदर अधिसूचना वरिष्ठांच्या आदेशानुसार किंवा कर्तव्यपूर्तीसाठी हत्यारे बाळगणे आवश्यक आहे, अशा शासकीय अधिकाऱ्यांना अशी हत्यारे योग्य रितीने बाळगण्यासाठी अगर ठेवून घेण्यासाठी लागू नाही. ही अधिसूचना खऱ्या प्रेत यात्रेसाठी, अंत्यविधीच्या जमावास अगर शासकीय समारंभासाठी लागू नाही. तथापि, सदर कालावधीत होणारे उत्सव, सभा, मिरवणूका इत्यादी कार्यक्रमास परवानगी देण्याचे अधिकार संबंधित तहसिलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी यांना देण्यात येत आहेत. तहसिलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी यांनी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन शांतता धोक्यात येणार नाही याची जबाबदारी आयोजकांवर राहील, या अटीवर परवानगी द्यावी असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या