![]() |
https://www.raigadmazanews.in.net/2024/11/blog-post_30.html |
यावेळी मुरुड गटातील साळाव,मराठी शाळेतील उपक्रमशील शिक्षिका रेश्मा कृष्णा धुमाळ यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरण जागरुकता बाबत मार्गदर्शन करताना पर्यावरण म्हणजे काय? पर्यावरणाचे घटक, पर्यावरणाचे प्रदूषण, प्रदूषणावर उपाय योजना इत्यादी बाबत सविस्तर माहिती दिली.
यामध्ये साडीच्या बॉक्स पासून पिशवी तयार करणे व बेस्ट फॉर वेस्ट यामध्ये प्लास्टिक पिशवी पासून फुले तयार करणे हे पर्यावरण पुरक उपक्रम घेण्यात आले. या कार्यशाळेत इयत्ता चौथी ते सातवीच्या सर्व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता. विद्यार्थ्यांनी टाकाऊ वस्तु पासून सुंदर व आकर्षक पिशव्या व फुले तयार केली. विद्यार्थी या कार्यशाळेत रममाण झाले होते. त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसांडून वाहत होता. या कार्यशाळेला दिपक फाउंडेशनच्या सुपरवायझर रोहिणी भगत, मृणाली मारवाडी, अक्षता खांडेकर,समिया धनसे व शिक्षक वृंद यांचे सहकार्य लाभले तसेच शाळेचे मुख्याध्यापक मोहम्मद फारूक यांनी मुलांचे कौतुक केले तर शाळेचे सहशिक्षक इस्राईल फकीर यांनी उपस्थितांचे आभार मानले.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या