Type Here to Get Search Results !

सुपेगांव रस्त्यावरील झाडाझुडुपे काढण्यास सुरुवात? वाहनचालक, प्रवासी व नागरिकांत समाधान


RAIGAD MAZA NEWS

रायगड माझा न्यूज EFACT

कोर्लई,ता.29(राजीव नेवासेकर) मुरुड -सुपेगाव -रोहा रस्त्यावरील सुपेगांव ते तळेखार फाटा रस्त्यालगत गेल्या अनेक दिवसांपासून असलेला झाडाझुडपांचा विळखा ह्या वृत पत्रातील बातमीची संबंधित बांधकाम खात्याने दखल घेऊन झाडेझुडपे काढण्यास सुरुवात करण्यात आल्याबद्दल वाहनचालक, प्रवासी व नागरिकांतून समाधान व्यक्त केले जात आहे.

मुरुड -सुपेगांव-रोहा रस्त्यावर सुपेगांव ते तळेखार, फाट्यावर जाताना असलेला झाडाझुडुपांचा विळखा अपघाताला आमंत्रण ठरत असून तो हटविणार कधी ? असा सवाल वाहनचालक,प्रवासी व नागरिकांतून विचारला जात असून संबंधित बांधकाम खात्या बाबत नाराजी व्यक्त केली जात असल्याचे वृत्त वृत्तपत्रातून देण्यात आले होते.

 मुरुड-रोहा प्रवासात जवळचा मार्ग असलेल्या मुरुड तालुक्यातील सुपेगांव रस्त्यालगत अनेक ठिकाणी असलेला झाडाझुडपांचा विळखा आणि अरुंद रस्ता   गेल्या तीन वर्षांपासून साईडपट्ट्या झाडाझुडुपांनी भरलेल्या असून त्या साफ करण्यासाठी मागणी केली जात आहे.अपघातानंतरच संबंधित बांधकाम खात्याला जाग येणार काय ? असा सवालही प्रवासी व वाहनचालकांकडून विचारला जात आहे.

   कोकणात भरपूर प्रमाणात पाऊस पडत असतो.गवत, झाडी झुडपे मोठ्या प्रमाणावर वाढत असतात, रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली झाडी झुडपे हटविण्यासाठी बांधकाम खात्याकडे निधी वा तरतूद करण्यात येते काय? आणि जर का काही तरतुदी असतील तर या रस्त्यावरील सुपेगाव भागात तीन वर्षे ही समस्या भेडसावत आहे.याबाबत शासन स्तरावर वरीष्ठ अधिकारी लक्ष देतील काय? असा सवाल प्रवासी व वाहनचालकांकडून विचारला जात होता.

   फणसाड अभयारण्य व मुरुड-जंजिरा पर्यटनात रत्नागिरी, पुणे, कोल्हापूर अन्य ठिकाणाहून काशिद-बिच, फणसाड अभयारण्य, मुरुड-जंजिरा किल्ला पाहाण्यासाठी रोहा सुपेगांव मार्गे मुरुड रस्ता जवळ असल्याने या रस्त्यावर शनिवार रविवार व सुटीच्या दिवशी वाहनांची वाढती वर्दळ असते. मागील महिन्यापासून या रस्त्यालगत ब-याच ठिकाणी गवत वाढले असून झाडाझुडपांचा विळखा असल्याचे वृत्त वृत्तपत्रातून प्रसिद्ध होताच संबंधित बांधकाम खात्याने दखल घेऊन या रस्त्यावरील झाडाझुडुपांचा विळखा हटविण्यास सुरुवात करण्यात आल्याबद्दल वाहनचालक प्रवासी व नागरिकांतून समाधान व्यक्त केले जात आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad

फॉलोअर