कोर्लई,ता.१७(राजीव नेवासेकर)मुरुड समुद्र किनार्यावर शनिवारी मुरुड बिच शोला
शानदार सुरुवात झाली. हा कार्यक्रम पाहण्यासाठी पर्यटकांसह मुरुडकरांनी तुफान गर्दी केली होती. यावेळी स्थानिक कलाकारांसह आलेल्या पर्यटकांपैकी कलाकारांनीही आपल कला सादर करत गाण्यांवर थिरकत ठेका घेतला.
समुद्र किनार्यावर गेल्यावर्षीपासून दर शनिवार आणि रविवारी हा कार्यक्रम सुरु करण्यात आला आहे.
योगेश पवार यांनी या कार्यक्रमाची धुरा सांभाळली आहे. गायक लाभेश पाटील, मोनिका पाटील यांनी आपल्या गाण्यांनी उपस्थिना मंत्रमुग्ध केले. तर सारथी माळी, भुषण सुतार जिवन पवार तेजस माळी यांच्या वाद्याच्या तालावर पर्यटकांना थीरकायला भाग पाडले.
ज्येष्ठ छायाचित्रकार सुधीर नाझरे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून उद्घाटन करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार राजन वेलकर, रायगड प्रेस क्लबचे माजी अध्यक्ष भारत रांजणकर, उपाध्यक्ष मोहन जाधव, वरिष्ठ पत्रकार हर्षद कशाळकर, राजेश भोस्तेकर तसेच अन्य पत्रकारांची या कार्यक्रमाला उपस्थितीती लाभली. अनिकेत काठे आणि आदित्य बोर्लीकर यांचे या कार्यक्रमाला सहकार्य लाभले.
यावेळी मुरूडचे पर्यटन वाढावे, स्थानिकांना यातुन रोजगार मिळावा हा उदेश आहेच परंतू रायगडात येणार्या पर्यटकांनी आनंद घेवून परत जावे ही मुख्य धारा या कार्यक्रमाची असल्याची माहिती कार्यक्रमाचे आयोजक राजन वेलकर यांनी दिली.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या