Type Here to Get Search Results !

पनवेल विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या खर्चाची द्वितीय तपासणी संपन्न



Raigad Maza News

पंनवेल दि.15 विधानसभा मतदारसंघ निवडणूकीच्या अनुषंगाने उमेदवारांच्या दैनंदिन खर्चाची द्वितीय तपासणी निवडणूक खर्च निरीक्षक श्री रमेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

उमेदवारांच्या खर्चाची द्वितीय तपासणी निवडणूक आयोगाच्या

नियमांप्रमाणे पनवेल महानगरपालिका सभागृह, कार्यालयात करण्यात आली.निवडणूक निर्णय अधिकारी पवन चांडक,नोडल अधिकारी(खर्च) मंगेश गावडे,निलेश नलावडे

 यांच्या उपस्थितीत ही प्रक्रिया पार पडली. निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या नियमांप्रमाणे उमेदवारांनी सादर केलेला खर्च तपासला जात आहे.

विधानसभा निवडणूक लढवत असलेल्या उमेदवारांचे दररोजच्या खर्चाचे लेखे आणि खर्चाच्या पावत्या या लेखांकन पथकाकडे जमा केल्या जातात. त्याचवेळी शेंडो रजिस्टर मध्ये उमेदवाराचा रोजचा प्रचारखर्च नोंदवला जातो. त्याचप्रमाणे इतर पथकाकडून रोकड अथवा इतर जप्ती झाल्यास त्याचीही नोंद लेखा पथकाकडून घेतली जाते.

भारत निवडणुक आयोग कार्यालयाकडील निवडणुक खर्च संनियंत्रण संदर्भातील तरतूदीनुसार उमेदवारांनी केलेल्या दैनंदिन खर्चाची तपासणी करण्यात येत आहे. ही तपासणी तीन टप्प्यात करण्यात येणार असून त्यातील दुसरा टप्पा पुर्ण झाला आहे. तसेच उमेदवारांच्या खर्चाची तिसरी आणि शेवटची तपासणी येत्या १८ नोव्हेंबर रोजी पार पडणार आहे. या तिसऱ्या म्हणजेच शेवटच्या तपासणीसाठी विहीत वेळेत उमेदवारांनी किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी खर्चाचा तपशील सादर करावा, अशी सूचना निवडणूक निर्णय अधिकारी पवन चांडक  यांनी दिली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad

फॉलोअर