Type Here to Get Search Results !

सोगावमध्ये बालदिन साजरा

कोर्लई,ता.१९(राजीव नेवासेकर)शाळेतून येताना कदाचित आपली बस चुकली अथवा यात्रेमध्ये आपल्या बरोबरची  माणसा  पासून कधी चुकलो, दूर झालो अशावेळी अनोळखी माणसांसोबत न जाता शाळेत पुन्हा मुख्याध्यापकांना भेटावे, यात्रेत गर्दीच्या वेळी पोलीस काका अथवा पोलीस मावशी यांच्या जवळच  जाऊन आपण हरवले आहोत असे सांगावे यासाठी प्रत्येक मुलाने आपल्या आई-वडिलांचे व  जेथे वसतिगृहात राहतो तेथील प्रमुखांचे मोबाईल क्रमांक कायम सुरक्षेसाठी आपल्या पुस्तकांच्या दप्तरात ठेवावे.असे आवाहन ज्येष्ठ पत्रकार आपत्ती व्यवस्थापन तज्ञ डॉ. जयपाल पाटील यांनी अलिबाग तालुक्यातील सोगांव येथील एस. ओ. एस. बालग्राम  येथे केले...

   बाल दिनानिमित्त आयोजित केलेल्या आनंदोत्सवात व्यासपीठावर रायगड जिल्हा न्यायालयाच्या विधी सेवा समितीचे सचिव न्यायमूर्ती अमोल शिंदे,राष्ट्रीय केमिकल आणि फर्टीलायझरचे सी.आय.सी.एफ.चे कमांडर संदीप चक्रवर्ती, प्रा.शाम जोगळेकर,डॉ. जयपाल पाटील, ॲड. श्रीमती शेख पी. सी. पी. ओ. श्रीमती सुजाता, बी. डब्ल्यू. सी. डी. श्री. पाटील, पठाण, बाजपेयी आदी.मान्यवर उपस्थित होते...

 यावेळी डॉ. जयपाल पाटील यांनी त्यांच्या  रशियन भाषेत रूपांतरित आणि मॉस्को आणि ताश्कंद आकाशवाणीवरून प्रसारित झालेल्या   बालकवितांपैकी माझी दिवाळी, आई, ताई, सर्व नवीन आणा, चला चला खेळू आणि  लाडू कविता सादर केल्या व मुलांना आणि पालकांना आपत्ती व्यवस्थापनाचा धडा दिला. यावेळी एडवोकेट श्रीमती शेख यांनी मानवी तस्करी बाबत मार्गदर्शन केले तर ब्रिगेडियर संदीप चतुर्वेदी प्रा. शाम जोगळेकर यांनीही यशाच्या वैयक्तिक कथा सांगितल्या व आपले जीवन कसे मार्गक्रमण करू शकतात हे सांगितले शेवटी कार्यक्रमाचे अध्यक्ष न्यायाधीशश्री. अमोल शिंदे यांनी मुलांनी त्यांच्या स्वप्नांचे अनुकरण करण्यास त्यांचे मार्ग हुशारीने विकासासाठी आणि यश मिळवण्यासाठी कठोर परिश्रम करण्यास प्रोत्साहित करावे असे सांगितले.यावेळी पाहुण्यांच्या हस्ते एस ओ एस ने आयोजित केलेल्या सांस्कृतिक स्पर्धांची बक्षिसे देण्यात आली यावेळी मुलांनी त्यांचे विचार अनुभव मांडण्याची आणि त्यांच्या कलागुणांना सांस्कृतिक कार्यक्रमातून दाखविण्याची संधी मिळाली कार्यक्रमाचे प्रास्ताविक एसओएस चे प्रमुख संजय बाजपेयी यांनी केले तर आभार श्री पठाण यांनी मांडले या कार्यक्रमास ६५ मुले,पालक,ग्रामस्थ उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad

फॉलोअर