रायगड दिशा अकॅडमीसीएच्या यशात मजगांवच्या नचिकेत बुल्लू याची शानदार कामगिरी
कोर्लई,ता.१६(राजीव नेवासेकर) लोणावळा येथे दिशा क्रिकेट अकॅडमी रायगड आणि मास्टर क्रिकेट असोसिएशन, लोणावळा यांच्या संयुक्त विद्यमाने आणि मायक्रोस्कॅन इन्फोकॅामटेक प्रा.लि. यांच्या सहकार्याने १४ वर्षाखालील २० षटकांची दिशा प्रीमियर लीग पर्व पाहिले ही क्रिकेट स्पर्धा एस.पी.जे. या भव्य मैदानावर खेळवण्यात आली. या स्पर्धेत अंतिम सामन्यात रायगड दिशा अकॅडमीने ८ गडी ६ शटके २ चेंडू राखून घवघवीत यश मिळविले.
सौराष्ट्र जय शिवराय क्रिकेट अकादमी, स्कायलाईन एक्सिलन्स क्रिकेट अकादमी (कराड), सुप्रीम क्रिकेट अकादमी (मुंबई) येथील जिल्हास्तरीय तसेच राज्यस्तरीय संघानी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता.
या स्पर्धेत दिशा अकॅडमीचा शुभ वाघ याने २६२ धावा काढून उत्कृष्ट फलंदाज ठरला ! सुप्रीम क्रिकेट अकॅडमीचा राज म्हामूनकर ४ गडी राखून उत्कृष्ट गोलंदाज, दिशा क्रिकेट अकॅडमीचा आर्यन बंडगर उत्कृष्ट यष्टिरक्षक तर जय शिवराय क्रिकेट अकॅडमीचा प्रिन्स गोस्वामी उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ठरला ! यात दिशा अकॅडमीचा शुभ वाघने २ गडी राखून २६२ धावा काढल्याने त्याला मालिकावीर देण्यात आले.
या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज आणि गोलंदाजाला आकर्षक शुज आणि चषक तसेच मालिकेचा मानकरी आकर्षक किट बॅग बक्षीस मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.
अलंकार जाधव(कर्णधार),अनिल जाधव यष्टीरक्षक ,आर्यन बंडगर,आकाश चौधरी,पियुष इंदलकर,चिन्मय पाटील,नचिकेत बुल्लु,प्रांजल चिपळूणकर,शुभ वाघ,गौरांग गुप्ता,ओंम म्हसकर,रिषभ टवाले,पृथ्वीराज जवके तसेच यशवंत नगर श्री छत्रपती शिवाजी नुतन विद्यालयाचा विद्यार्थी कु.नचिकेत बुल्लुने देखील मोलाचे योगदान दिले.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या