Type Here to Get Search Results !

कर्जत विधानसभा मतदार संघामध्ये दि.१५ व दि.१६ नोव्हेंबर रोजी होणार दिव्यांग,ज्येष्ठांचे गृहमतदान

Raigad Maza News
रायगड माझा न्युज 

रायगड(जिमाका)दि.१२:- १८९-कर्जत विधानसभा मतदार संघामध्ये पोस्टल बॅलेटकरिता ८५+ मतदार १७३  व दिव्यांग १६ नी घरुन मतदान करण्याकरिता पोस्टल बॅलेटसाठी १२ ड अर्ज दिले आहेत.. त्यानुसार १८९-कर्जत विधानसभा मतदार संघामध्ये शुक्रवार, दि.१५ नोव्हेंबर व शनिवार, दि.१६ नोव्हेंबर २०२४ रोजी दिव्यांग व ज्येष्ठांचे गृहमतदान होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी १८९-कर्जत विधानसभा मतदार संघ तथा उपविभागीय अधिकारी कर्जत प्रकाश सकपाळ  दिली आहे.

निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी प्रकाश सकपाळ यांच्या मार्गदर्शनात संपूर्ण मतदारसंघात शुक्रवार, दि.१५ नोव्हेंबर व शनिवार, दि.१६ नोव्हेंबर २०२४ रोजी ८ पथके कार्यरत असणार आहेत. ही मतदान प्रक्रिया दोन दिवस सुरू राहणार आहे.

कर्जत मतदारसंघामध्ये ८५ वर्षांवरील १७३ व दिव्यांग १६ मतदार अशा एकूण १८९ मतदारांची गृहमतदानासाठी नोंदणी करण्यात आली आहे. शुक्रवार, दि.१५ व शनिवार, दि.१६ नोव्हेंबर २०२४ रोजी घरोघरी जाऊन मतदान केंद्राची उभारणी करूनटपाली मतदान घेतले जाणार आहे

येत्या २० नोव्हेंबर रोजी होत असलेल्या विधानसभा निवडणूकीत मतदारांनी निर्भयपणे मतदानाचा हक्क बजवावा, मतदानासाठी नागरिकांमध्ये जागरुकता यावी, म्हणून मतदारसंघात विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. लोकशाहीच्या या उत्सवात मतदानाचे पवित्र कार्य पार पाडावे, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी प्रकाश सकपाळ  यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad

फॉलोअर