कोर्लई,ता.२९(राजीव नेवासेकर)मुरुडच्याअंजुमन इस्लाम जंजिरा डिग्री कॉलेज ऑफ सायन्स,राष्ट्रीय सेवा योजना, आजीवन अध्ययन शिक्षण विस्तार विभाग व माजी विद्यार्थी संघटना यांच्यातर्फे प्राचार्य डॉ. साजिद शेख यांच्या मार्गदर्शनाखाली शिघ्रे आदिवासीवाडी येथे दिवाळीनिमित्त कपडे व फराळाचे वाटप करण्यात आले.
दिवाळी हा सण वर्षातील महत्वाचा सण असतो. मात्र, अनेकांना आर्थिक अडचण असल्याने हा सण उत्साहात साजरा करता येत नाही याचे भान ठेऊन व आपणही समाजाचे काहीतरी देणे लागतो या हेतूने महाविद्यालयातील आजी माजी विद्यार्थ्यांनी व प्राध्यापक यांनी नवीन, वापरात नसलेले कपडे तसेच खाऊ जमा करून शिघ्रे आदिवासी वाडी येथील आदिवासी बांधवांना वाटप करण्यात आले.
राष्ट्रीय सेवा योजना विभाग प्रमुख डॉ.फिरोज शेख, प्रा. अल्ताफ फकीर, प्रा. जावेद खान, प्रा. निदा गोरमे आणि विद्यार्थ्यांमध्ये हुमेरा घारे, सना कारभारी, रोज्मीन कासकर, रुकय्या शिघ्रेकर, तयाबा कडू यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. या उपक्रमासाठी आदिवासी वाडी प्रमुख गुलाब वाघमारे आणि समीर वाघमारे यांचे सहकार्य लाभले.
________________________________________
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या