कोर्लई,ता.३०(राजीव नेवासेकर) मुरुड मधील पद्मदुर्ग कल्याणकारी व्यावसायिक मंडळाचे अध्यक्ष अरविंद गायकर, प्रवासी संघटना अध्यक्ष श्रीकांत सुर्वे, प्रवासी व नागरिकांच्या मागणीनुसार मुरुड आगारातून मुरुड -अलिबाग-मुरुड अशी शटल सेवा सुरू करण्यात आली असल्याची माहिती आगार प्रमुख राहुल शिंदे यांनी दिली.
मुरुड येथून अलिबाग कडे जाण्यासाठी सकाळी ५-०० वा.,६-०० वा.,९-१५ वा.,१०-१५ वा., दुपारी १-१५ वा.२-३० वा.तर अलिबागहून मुरुडकडे येण्यासाठी सकाळी ७-०० वा.,८-०० वा.११-१५ वा.दुपारी १२-३० वा.,३-१५ वा.४-३० वा.अशी प्रवाशांच्या सेवेसाठी शटल सेवा सुरू करण्यात आली असून या सेवेचा लाभ घ्यावा.असे आवाहन आगार प्रमुख राहुल शिंदे यांनी केले आहे.
________________________________________
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या