कोर्लई,ता.२९(राजीव नेवासेकर) मुरुडच्या वसंतराव नाईक महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजनेतर्फे प्राचार्य डॉ.जे.के.कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली विहूर येथील आदिवासी बांधवांना फराळ वाटप करण्यात येऊन दिवाळी गोड करण्यात आली.
वसंतराव नाईक महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेतर्फे विविध उपक्रम राबविण्यात येतात.त्याचाच भाग विहूर येथील १३५ आदिवासी बांधवांना फराळ वाटप करण्यात येऊन दिपावलीच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.जी.डी.मुनेश्वर,प्रा.डॉ.एस.एस.भैरगुंडे, स्वयंसेवक, आदिवासी बांधव, ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या