Type Here to Get Search Results !

फणसाड अभयारण्यात सरपटणारे प्राणी व उभयचर प्राण्यांचे सर्वेक्षण

 


कोर्लई,ता.४(राजीव नेवासेकर) मुरुड तालुक्यातील सुपेगाव येथील फणसाड अभयारण्यात ग्रीन वर्क्स ट्रस्ट व फणसाड वन्यजीव अभयारण्य यांच्या संयुक्तविद्यमाने भुपृष्टावरील सरपटणारे प्राणी व उभयचर प्राण्यांचे गणना प्रथमच पार पडली या सर्वेक्षणा साठी ११ राज्यातील एकूण १४३ लोकांची नोंदणी केली होत्या.यामध्ये ३ राज्यातील ४० सहभागींची निवड करण्यात आल्याची माहिती फणसाड अभयारण्य विभागाने दिली.

यावेळी उपवनसंरक्षक - अक्षय गजभिये , सहाय्यक वनसंरक्षक- मनोहर दिवेकर , वनपरिक्षेत्र अधिकारी- नारायण राठोड ,ग्रीन वर्कचे संस्थापक अध्यक्ष डॉ. निखिल भोपाळे त्यांची संपूर्ण टीम तसेच नांदगाव वनपाल  आदेश पोकळ , वनरक्षक अरुण पाटील , संतोष पिंगळा , वनमजुर  प्रदीप बगाडे , सदानंद नाईक आदींसह कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदविला.

    मुरुड सुपेगाव फणसाड अभयारण्य सुमारे ५२ चौ.कि.मी मध्ये विस्तारला असुन या 

तीन दिवसीय सर्वेक्षण कार्यक्रमात भुपृष्ठावर सरपटणाऱ्या प्रजातींमध्ये मुख्यतः साप १६ , बेडूक २० , सस्तन प्राणी १०, गेको ७,  मॉनिटर सरडे ३ स्किंक १ गिरगिटासह २ नागीण ४५

पाली ४, घोरपड ३, फुलपाखरु ५०  व पक्षी १०४ नोंदविण्यात आल्या.

ग्रीन वर्क्स ट्रस्ट चे विश्वस्त यांच्या शी संवाद केला असता ते म्हणाले की हा सर्वेक्षण स्टेट बँक ऑफ इंडिया व ग्रीन वर्क्स ट्रस्ट यांच्या संयुक्त पुढाराकाने हाती घेतल्यामुळे फणसाड अभयारण्यातील दुर्मिळ जैव विविधतेचा सूक्ष्म आणि स्थूल अभ्यास करून निश्चितपणे काही निरीक्षण नोंदविणे शक्य झालं तसेच स्टेट बँकेने अर्थसहाय्य दिल्याने खऱ्या अर्थाने ही गणना शास्त्रोक्त पद्धतीने होऊ शकली. सरपटणारे प्राणी व उभयचर प्राण्यांचे सर्वेक्षण ५ वर्षे करायला हवी.असे मत ग्रीन वर्क्स ट्रस्टचे वतीने सांगण्यात आले.यावेळी प्रजातींची नोंदी करताना एक अनोखा अनुभव सहभागींनी बोलून दाखवला.

ग्रीन वर्क्स ट्रस्टचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय विश्वस्त डॉ. निखिल भोपळे यांनी बेडकांच्या प्रजाती ओळखण्यावर एक सत्र आयोजित केले होते ज्यामुळे सहभागींना सर्वेक्षणादरम्यान बेडूक ओळखण्यास मदत झाली.असल्याचा विश्वास ग्रीन वर्क्स ट्रस्ट च्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad

फॉलोअर