कोर्लई,ता.४(राजीव नेवासेकर) राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्ताने मुरुडच्या वसंतराव नाईक महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजनेतर्फे प्राचार्य डॉ जे.के.कांबळे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.एस.एस भैरगुंडे,प्रा.डॉ.जी.डी.मुनेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली
येथील समुद्र किनाऱ्यावर स्वच्छता अभियान राबविण्यात आले.यामधे राष्ट्रीय सेवा योजनेतील 89 स्वयंसेवकानी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता.
विद्यार्थ्यांनी
शासनाच्या स्वच्छता ही सेवा या अभियानात विद्यार्थ्यांनी सहभागी होवून आपला परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी मुरुड नगर परिषदेला सहकार्य करण्याचे आवाहन महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ. जे.के.कांबळे यांनी यावेळी केले.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या