Type Here to Get Search Results !

अंजुमन इस्लाम जंजिरा महाविद्यालयात मराठी भाषेस अभिजात दर्जा प्राप्त झाल्याबद्दल आनंदोत्सव साजरा


कोर्लई,ता.४(राजीव नेवासेकर)मराठी भाषा हा देशाचा अभिमान आहे. या उत्तुंग भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन.  भारताच्या परंपरेत मराठी कायमच अत्यंत महत्त्वाची आहे. आता अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे अनेक लोकांना मराठी भाषा शिकण्याची प्रेरणा मिळेल असा आम्हाला विश्वास वाटतो.

   आज दि. ४ ऑक्टोबर २०२४ रोजी कोंकण मराठी साहित्य परिषद मुरुड जंजिरा व अंजुमन इस्लाम जंजिरा डिग्री कॉलेज ऑफ सायन्स महाविद्यालयातील ग्रंथालय समिती व सांस्कृतिक विभाग यांच्यामार्फत मराठी भाषेस अभिजात दर्जा प्राप्त झाल्याबद्दल आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

    महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. साजिद शेख यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास संस्थेचे सहसचिव अब्दुल रहीम कबले , कोंकण मराठी साहित्य परिषद मुरुड जंजिरा चे अध्यक्ष संजय गुंजाळ, कार्यध्यक्ष संजय बागडे, उपाध्यक्ष उषा खोत, सचिव नैनिता कर्णिक, सदस्य नरेश कर्णिक, सदस्य सुनील मोहिले, कोमसाप जिल्हा युवाध्यक्ष सिद्धेश लखमदे, प्रशासन अधिकारी दीपाली दिवेकर आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अलताफ  फकीर याने करून सुरुवात महाराष्ट्र गीताने करण्यात आली. महाविद्यालयातील विद्यार्थिनी रिद्धी भगत, वेदिका आगरकर, रिया ठाकूर, श्रेया बाजी व क्रिपा धुमाळ यांनी आपले मनोगत व्यक्त केले. उपस्थित मान्यवरांमध्ये  प्र. प्राचार्य डॉ. साजिद शेख, प्रशासन अधिकारी दीपाली दिवेकर, अध्यक्ष संजय गुंजाळ यांनी सुद्धा मराठीच्या मोहिमेबद्दल आपाले मनोगत व्यक्त केले. युवाध्यक्ष सिद्धेश लखमदे यांनी आभार प्रदर्शन केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. अंजुम दाखवे व डॉ. स्वाती खराडे यांनी विशेष प्रयत्न घेतले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad

फॉलोअर