कोर्लई,ता.१६(राजीव नेवासेकर)मुरुड आगारातील बसेसची अवस्था जैसे थे म्हणे "रोज मरे त्याला कोण रडे" अशी अवस्था मुरुड आगाराची झाली आहे. जी पुर्वी अवस्था होती बसेसची तीच अवस्था आज ही आहे. रोज रस्त्यावर बंद पडण्याचे प्रमाण वाढले आहे. प्रवाशांचे मात्र प्रचंड हाल होत आहेत आणि लाडक्या बहीणी बेहाल झाल्या आहेत.
मुरुड आगारातील बसेस संदर्भात अनेकदा मागण्या सुद्धा केल्या आहेत नवीन गाड्या मिळत नाही परंतु प्रशासनाने जुन्या गाड्या नेऊन नुसत्या रंगरंगोटी करून पुन्हा त्याच गाड्या मुरूडकारांच्या माथी मारल्या आहेत. त्यामुळे पूर्वी जी अवस्था होती प्रवाशांची तीच अवस्था आजही पहावयास मिळत आहेत. आज दिनांक 15 ऑक्टोंबर रोजी सुटलेली पुणे स्वारगेट गाडी ही रेवदंडा परिसरात पंक्चर झाली. या गाडीला साधी स्टेफनी ही नाही त्यामुळे ड्रायव्हरने ही गाडी एका टायरवर अलिबाग आगारा पर्यंत नेली.
आगारामध्ये फिटर नसल्याने ही गाडी ताटकळत राहिली रात्रपाळीचे फिटर गेल्यामुळे दिवस पाळीचे फिटर आले नव्हते त्यामुळे प्रवाशांना ताटकलत राहावे लागले. या गाडीमध्ये मुरुडचे व्यापारी भावेश शाहा यांची मुलगी जिनल भावेश शाहा ही प्रवास करत होती. सदर प्रकरणाबद्दल तिने आपल्या वडिलांना मोबाईलद्वारे कळवले. तात्काळ तिच्या वडिलांनी सामाजिक कार्यकर्ते अरविंद गायकर यांच्याशी संपर्क साधला त्यावेळी अरविंद गायकर यांनी जिल्हा वाहतूक नियंत्रक यांच्याशी संपर्क साधून काही पुण्याला प्रवास करणाऱ्या प्रवाशांची समस्या तात्पुरती सोडवली पुण्याला जाणाऱ्या लोकशाही बस मध्ये काही प्रवाशांना पाठविण्यात आले.
अलिबाग वरून सुटणाऱ्या या लोकशाही बसने मुरुडच्या या प्रवाशांना लोणावला येथे गाडी बदलण्यास उतरवले सदर लोकशाही बस ही पुण्यापर्यंत जाणारी होती तरीही त्यांना खाली उतरवण्यात आले आणि दुसरी बस पकडण्यास भाग पाडले यामध्ये मुरुडच्या प्रवाशांचे प्रचंड हाल झाले सोबत असलेले सामान सांभाळत कितींदा गाडी बदलायची हा प्रश्न प्रवाशांना पडला या गाडीमध्ये मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणीही प्रवास करीत होत्या त्यांचेही बेहाल झाले.
या मुरुड आगारातील झालेल्या भंगार बसेस रंगरंगोटी न करताना पूर्णपणे नवीन देण्यात याव्या अन्यथा एखादा मोठा अपघात होऊन अनेक प्रवाशांचे जीव जाऊ शकतात तरी प्रशासनाने काळजी घेऊन जुन्या बसेस ना रंगरंगोटी करून पाठवू नये अशी विनंती स्थानिक नागरिकांनी व सर्व प्रवासी वर्गांनी केली आहे.
मुरुड एसटी द्वारे मी अनेकदा प्रवास करत असते मुरुड पुणे असा प्रवासादरम्यान सर्वच गाड्या ह्या भंगार गाड्या असतात या प्रवासाधारणा अनेक वेळा रस्त्यांमध्ये या गाड्या बंद पडत असतात आतल्या खुर्च्या तुटलेल्या असतात हलत असतात संपूर्ण बॉडी हलत असते तरी या गाड्या पूर्णपणे नवीन देण्यात याव्यात अशी विनंती आहे.... जिनल भावेश शाहा.... मुरुड
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या