कोर्लई,ता.१८(राजीव नेवासेकर)मुरुड जंजिरा सार्वजनिक वाचनालय व कोकण मराठी साहित्य परिषद शाखा मुरूड यांच्या संयुक्त विद्यमाने सार्वजनिक वाचनालयात संपन्न झाला .सार्वजनिक वाचनालयाच्या उपाध्यक्षा दीपाली जोशी, सचिव विनय मथुरे,कोकण मराठी साहित्य परिषद शाखेचे अध्यक्ष संजयजी गुंजाळ, कार्याध्यक्ष अरुण बागडे, प्रमुख मार्गदर्शक नगरपरिषद शिक्षण समिती प्रशासन अधिकारी दीपाली दिवेकर,शकील कडू सर,ग्रंथपाल उत्कर्षा गुंजाळ यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वतीला पूष्पहार सरस्वतीला पुष्पहार अर्पण करण्यात आला. तद्नंतर स्वर्गीय ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा, स्वर्गीय अभिनेता अतुल पुरचरे ज्ञात, अज्ञात दिवंगतांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.युवा अध्यक्ष सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. प्रास्ताविकात उपाध्यक्षा दीपाली जोशीबाई यांनी कार्यक्रमाची रूपरेषा सांगून स्वर्गीय राष्ट्रपती डाॅ.अब्दुल कलाम यांच्या विषयी माहिती सांगून त्याचा जन्मदिवस आपण वाचन प्रेरणा दिन,व जागतिक विद्यार्थी दिवस मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याने आनंदोत्सवही साजरा करीत आहोत हे नमूद केले. अभिजित दर्जा म्हणजे काय,आज ११ भाषांना अभिजात दर्जा मिळाल्याने होणारे फायदे सांगितले.आपल्या मराठी भाषेचे वैशिष्ट्य म्हणजे या भाषेत काना, मात्रा वेलांटी,उकार आहेत.व अभिजात दर्जा रंगनाथन पाठारे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने २०१२मध्येअहवाल सादर केला. केंद्र सरकारने फार मोठे पाऊल उचलले यामुळे सन्माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांचे सर्वांच्या वतीने कृतज्ञता व्यक्त केली. जो मातृभाषेतून शिकतो तोच पुढे जातोअसे प्रतिपादन केले. आशिष पाटील यांनी गा-हाणे स्वरूपात कविता सादर केली.प्रमुख मार्गदर्शक नगरपरिषद शिक्षण समिती प्रशासन अधिकारी दीपाली दिवेकर यांनी आपल्या मनोगतात अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा ताराबाई यांच्या कार्याचा गौरव केला.अभिजित भाषेचे ४ निकष उदाहरणेसहित स्पष्ट केले.व भाषेच्या विकासासाठी अनुदान देण्यात येणार आहे.परंतु वाचक वाढवण्यासाठी आपण प्रयत्न करणे गरजेचे आहे हे निदर्शनास आणले.डाॅ अब्दुल कलाम यांचे विज्ञान क्षेत्रातील योगदान या विषयावर भाष्य केले.याच बरोबर वाचाल तर वाचाल, संस्कृती वाचवाल, मराठी ज्ञानभाषा होणे गरजेचे आहे.विद्यार्थ्यावर त्यांचे अतोनात प्रेम होते विद्यार्थ्यांची संवाद साधतानाच डाॅ कलाम यांना देवाज्ञा झाली.हे नमुद केले.सूत्रसंचालन युवा अध्यक्ष तथा गझलकार सिद्धेश लखमदे यांनी उत्तम केले.आपल्या निवेदनात मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाविण्यासाठी राष्ट्रपतींना १०००पत्रे पाठविली होती, आदरणीय मधुभाई कर्णिक यांच्या नेतृत्वाखाली आझाद चौक येथे आंदोलन करण्यात आले होते.अश्या प्रयत्नात मुरूडचाही खारीचा वाटा उचलला होता हे निदर्शनास आणून दिले.कार्यक्रमाचे औचित्य साधून नवरात्रोत्सव उत्सवात वाचनालयातफे शाळांतील विद्यार्थ्यांच्या चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती त्याचे बक्षिस वितरण समारंभ मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.चित्रकला स्पर्धा यशस्वी होण्यासाठी वाचनालयाचे संचालक, चित्रकार अच्युत चव्हाण, चित्रकार महेंद्र पाटील सर,परीक्षक विनोद नरवणकर, विवेक भगत, स्वप्निल भायदे यांनी मोलाचे सहकार्य केले.कार्यक्रमासाठी कोकण मराठी साहित्य परिषद मुरूड सदस्य नयन कर्णिक, वैशाली कासार बाई,रोटकर,चवरकर बाई, शशीकांत भगत , स्पृहा लखमदे उपस्थित होते.सार्वजनिक वाचनालय संचालिका नैनिता कर्णिक यांनी भारतरत्न डॉ कलाम यांच्या जीवनावर आधारित कविता सादर करून आभार मानले.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या