कोर्लई,ता.५(राजीव नेवासेकर)रायगड जिल्ह्यांतील श्रीवर्धन तालुक्यामधील दिघी पोर्ट हे बंदर NCLT कडून १५ फेब्रुवारी २०२१ रोजी अदानी समूहाने दिघी पोर्टचा ताबा घेतल्यापासून प्रत्येक वेळेला कामगारांच्या बाबतीत दुजा भावाची भूमिका मॅनेजमेंट घेत असल्याचे वारंवार दिसून येत आहे.
नुसत्याच पार पडलेल्या चालू आर्थिक वर्षांमध्ये ४०० MMT ( मिलियन मॅट्रिक टन )टारगेट अचीवमेंट केल्यानंतर अदानी समूहामध्ये काम करत असलेल्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये तसेच इतर ठिकाणी काम करणाऱ्या कामगारांना दोन बेसिक पगार देऊन गौरविण्यात आले, परंतु दिघी पोर्ट मधील हे २००९ पासून काम करणारे श्रीवर्धन, म्हसळा , मुरुड तालुक्यामधील सर्वच स्थानिक कामगार बंधू कामगारांना या लाभापासून वंचित ठेवून कामगारांमध्ये मॅनेजमेंटने कुठेतरी असंतोष निर्माण करण्याचे वातावरण तयार केले.
परंतु अदानी समूहाच्या दिघी पोर्ट मध्ये कॉन्ट्रॅक्ट मध्ये काम करणारे एक महिना अगोदर रुजू झालेल्या कामगाराला सुद्धा या दोन बेसिक सन्मान देऊन गौरवण्यात आले.
याबाबतीत रायगडचे खासदार सुनील तटकरेश यांच्या नेतृत्वाखाली युनियन चे नेते श्री संजय जी वढावकर साहेब जनरल मजदूर सभा युनियन च्या माध्यमातून गेली तीन महिने वारंवार आदरणीय खासदार साहेब यांच्या समक्ष दिघी पोर्ट मधील अदानी मॅनेजमेंट, युनियन, आणि युनियनच्या कमिटी मेंबर्स यांच्यामध्ये वारंवार बैठका घेऊन सुद्धा हा विषय अद्याप पर्यंत मार्गी लागलेला नाही.
प्रत्येक वेळी आदरणीय खासदार साहेब याने अदानी समूहाच्या वरिष्ठ मॅनेजमेंटचें प्रतिनिधी सी . एस. राजू साहेब तसेच दिघी पोर्ट चे CEO कपिल कुमार खंडेलवाल साहेब, यांना वारंवार खासदाराने हा विषय सोडवण्या संदर्भाची सूचना तसेच आदेश देऊन सुद्धा मॅनेजमेंट ने खासदार सुनील तटकरे यांनी केलेल्या सूचनेचा अनादर दाखवल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.
या भूमिकेबाबत स्थानिक कामगार यामध्ये तीव्र नाराजी निर्माण होऊन या सर्व बाबीचा निषेध म्हणून सर्व कामगार बंधूंनी शांत व संयमाच्या बाबतीत आपापल्या शर्ट च्या खिशाला काळी फित लावून जाहीर निषेध नोंदवत आहेत.
मॅनेजमेंटच्या या मूजोर भूमिकेबद्दल सर्व दिघी पोर्ट चे कामगार नाराजीचे सूर सर्वत्र उमटत आहेत. सर्व कामगार बंधू काहीच दिवसात तीव्र आंदोलनाच्या तयारीमध्ये आहेत.यातून अदानी समूहाचे नाव मोठे लक्षण खोटे ही भूमिका दिसत असल्याचे बोलले जात आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या