कोर्लई,ता.५(राजीव नेवासेकर)लायन्स क्लब मुरुड जंजिरा तर्फे तालुक्यात विविध शैक्षणिक सामाजिक उपक्रम राबविले जातात.जग भारातील लायन्स क्लब ऑक्टोबर सर्विस वीक हा उपक्रम राबवत असतात.त्याच्या पहिल्या दिवशी मुरुड तालुक्यातील बोर्ली व काशिद परिसरातील आठ अंगणवाड्यांना वाॅटर फिल्टर वाटप करण्यात आले.
यावेळी लायन्स क्लब मुरुड जंजिरा अध्यक्ष लायन मकरंद कर्णिक,उपाध्यक्ष लायन सनी सोगावकर, सदस्य लायन विजय शिंदे व बोर्ली व काशिद परिसरातील नागरिक उपस्थित होते.
लायन्स क्लब ऑफ अलिबाग यांनी हे वॉटर फिल्टर उपलब्ध करून दिल्या बद्दल मुरुड क्लबचे अध्यक्ष मकरंद कर्णिक यांनी अलिबाग लायन्स क्लबच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानले.लायन्स क्लबने उपलब्ध करून देण्यात आलेल्या या वॉटर फिल्टर मुळे अंगणवाडीतील मुलांना शुद्ध, स्वच्छ पाणी मिळणार असल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या