कोर्लई,ता.६(राजीव नेवासेकर) मुरुडच्या दत्तवाडीवरील शाहनवाज खतीब यांच्या कंपाऊंड मध्ये साफसफाईची कामे सुरू असता अडगळीत वेटोळे घालून बसलेल्या नऊफुटी अजगराला सर्पमित्र संदीप घरत यांनी वनविभागाच्या सहकार्याने आपल्या कौशल्याने पकडून जवळील जंगलात सुरक्षितपणे सोडून जिवदान दिल्याबद्दल सर्वत्र कौतुक केले जात आहे.
येथील दत्तवाडीवर राहाणारे शाहनवाज खतीब यांच्या कंपाऊंड मध्ये साफसफाईची कामे सुरू असता कामगारांना अडगळीत वेटोळे घालून बसलेला अजगर आढळून आला, त्यांनी तात्काळ सर्पमित्र संदीप यांच्याशी संपर्क साधला असता सर्पमित्र संदीप घरत यांनी दत्तवाडी येथे येऊन वनविभागाचे वनपरिमंडळ अधिकारी राहूल कुलकर्णी व वनरक्षक किरण गायकर यांच्या सहकार्याने आपल्या कौशल्याने नऊफुटी अजगराला पकडून जवळील जंगलात सुरक्षितपणे सोडून जिवदान दिल्याबद्दल सर्वत्र कौतुक व्यक्त केले जात आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या