Type Here to Get Search Results !

पद्मदुर्ग कल्याणकारी व्यावसायिक मंडळाच्या निवेदनाला यश मुरुड -अलिबाग शटल सेवा सुरू करणार विभाग नियंत्रक दिपक घोडे यांचे आदेश


कोर्लई,ता.२९(राजीव नेवासेकर) राज्य परिवहन महामंडळाच्या मुरुड आगारात गेल्या अनेक दिवसांपासून भंगार अवस्थेतील गाड्यांमुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत असून लांब पल्ल्याच्या तसेच लोकल सेवेतील गाड्या रस्त्यात बंद पडण्याच्या प्रकारात महिनाभरात वाढ झाल्यामुळे पद्मदुर्ग कल्याणकारी व्यावसायिक मंडळाचे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते अरविंद गायकर यांनी आगाराला निवेदनाद्वारे टाळे ठोकण्याचा इशारा देताच विभागीय नियंत्रक यांनी मुरुड आगाराला भेट देऊन समस्या जाणून घेतल्या.यावेळी एस.टी.सेवेत प्रवाशांच्या विविध समस्यांचे निराकरण न झाल्यास, परिस्थिती जैसे थे राहिल्यास विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता संपताच आगारा समोर आत्मदहन करण्याचा इशारा अरविंद गायकर यांनी यावेळी दिला.

     मुरूड आगाराला MS बॉडी बांधिच्या असलेल्या गाड्या कमी प्रमाणात पाठविल्या गेल्या त्यामुळे अजुन सुध्दा मुरूड आगारातुन लांबपल्यासाठी म्हणजे मुंबई मुरूड, मुरूड बोरीवलीसाठी वापरण्यात येणा-या गाड्या जुन्या भंगारात टाकाण्यालायक झालेल्या तुटलेल्या, गळक्या, नादुरस्त, अस्वच्छ गाड्या म्हणजे नं. एम.एच.०६.९५२८ मुरुड बोरविली. एम एच.१४/ बी टी १४४६, हया लाल परी भंगारमध्ये टाकण्या लायक झालेल्या आहेत.हया गाडयाचा वापर मुरुड आगारातुन लांब पल्याच्या प्रवासासाठी वापरल्या जातात तसेच मुरूड आगारातुन कुठलिही गाडी सोडताना त्या गाड्या संपुर्ण स्वच्छ न करता, ब्रेक, हेडलाईट, इंजिन हे व्येवस्थीत आहे. की नाही. खातरजमा न करता मुरूड आगारातुन लांबपल्यासाठी प्रवासासाठी सोडल्याने गाडी रस्त्यात बंद पडते. 

त्यामुळे प्रवाशांचे विनाकारण हाल होतात. कोणाला वेळेत कामावर पोचायच असत. कोणाला हॉस्पीटलला वेळेत पोचायच असत, विद्यार्थ्यांना वेळेत शाळेत पोचायच असत. व्यापा-यांना मुबंईला खरेदी करीता मार्केटला वेळेत पोचायच असत, कोणाला मयताला वेळेत पोचायच असत. कोणाला असे आनेक कारण आहेत त्या वेळेस आनेक प्रवाश्यांना वेळेत पोहता न आल्याने त्यांचे मोठयाप्रमाणात आर्थीक नुकसान होउन नाहक त्रास सहन करावा लागत आहे.त्यामुळे आमच्या आगारातील सर्व लालरंगाचा  (गाड्या) भंगारात काढुन त्या जागी सर्व नविन MS बॉडी बांधिच्या गाडया दयावा. मुरूड आगारातील लालरंगाचा (गाडया) पुर्ण पणे नष्ट करावा. तसेच विभाग नियंत्रक यांनी आमचे निवेदन मिळाल्या पासुन दोन दिवसात मुरूड आगाराला भेट द्यावी. व आमच्या व प्रवांश्याच्या व्याथा एकण्यासाठी ऐकुन घेण्यासाठी उपस्थीत राहावे. असे अरविंद गायकर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले होते.सदर निवेदनाची दखल घेऊन विभाग नियंत्रक दिपक घोडे यांनी मुरुड आगाराला आज भेट देऊन समस्या जाणून घेतल्या.

  यावेळी प्रवासी संघटनेचे अध्यक्ष श्रीकांत सुर्वे, सुधीर दांडेकर,सुशिल ठाकूर, भावेश शहा, देवेंद्र सतविडकर, समीर रांजणकर, उत्तम पाटील यांनी समस्या मांडल्या. नवीन गाड्या उपलब्ध होताच पंधरा गाड्या मुरुड आगाराला देण्यात येतील.असे सांगून अलिबाग -मुरुड अशी शटल सेवा उद्या पासून सुरू करण्याचे आदेश विभाग नियंत्रक दिपक घोडे यांनी यावेळी मुरुड आगार प्रमुख राहुल शिंदे यांना देण्यात आले.यांचं

मुरुड मधील एस टी सेवेत प्रवाशांच्या विविध समस्यांचे निराकरण न झाल्यास, परिस्थिती जैसे थे राहिल्यास विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता संपताच आगारा समोर आत्मदहन करण्याचा इशारा अरविंद यांनी यावेळी दिला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad

फॉलोअर