कोर्लई,ता.२(राजीव नेवासेकर)मुरुड तालुक्यातील चोरढे येथील रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतर्फ ग्रामस्वच्छता अभियान राबविण्यात आले.या अभियानाला ग्रामस्थांचा उत्तम प्रतिसाद मिळाला.
या शाळेने सन 2023 मध्ये 2 ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून ग्राम स्वच्छता अभियान राबवलेले होते. त्याचप्रमाणे यावर्षी सुद्धा शासनाच्या निर्देशानुसार एक ऑक्टोबर रोजी ग्राम स्वच्छता अभियान राबवण्याचे पालक मिटिंगमध्ये पालकांना आव्हान केले. पालकांना केलेल्या आव्हानाला प्रतिसाद देत शाळा व्यवस्थापन समिती सदस्य शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष त्यासोबत ग्रामपंचायत आणि ग्रामपंचायत सरपंच सदस्य आणि पालक वर्ग व ग्रामस्थ यांने मोठ्या प्रमाणावर भाग घेतला .
स्वच्छता अभियानात शाळेची इमारत,समोरील परिसर स्वच्छ करण्यात आला. गावातील रस्ते स्वच्छ करण्यात आले . शाळाच्या परिसरात,ग्रामपंचायत,स्मशानभूमी या परिसरामध्ये लोकांनी उत्स्फूर्तपणे भाग घेत संपूर्ण कचरा साफ करण्यात आला.यासाठी गंगाराम भोईर यांचा टेम्पोंची मोलाची साथ झाली.
शाळेपासून ग्रामपंचायत पर्यंत व ग्रामपंचायत पासून स्मशानभूमी पर्यंतचा संपूर्ण रस्ता हा स्वच्छ करण्यात आला. यामध्ये ७२ पालकांनी सहभाग घेतला. शाळेमध्ये राबवले जाणारे विविध उपक्रम आणि शाळेतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता हे बघून पालक वर्ग शिक्षकांकडे नेहमीच एक चांगल्या प्रकारचं मोलाची साथ करत असतात. शाळेमध्ये राबवलेले लेझीम उपक्रम , सहल त्यासोबत कर्नाटकचे सहल प्रयोग दिग्दर्शन तालुका विज्ञान प्रदर्शनातील क्रमांक असे विविध पारितोषिक आणि मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा यामध्ये तालुक्यात प्रथम क्रमांक असणारी ही शाळा ग्रामस्थांच्या , शिक्षकांच्या व पालकांच्या सहकार्याने सतत अग्रेसर राहत असते. शाळेने राबवलेल्या विविध उपक्रमामध्ये ग्रामस्थांचा मुलाचा सहभाग असतो.
" गाव करी ते राव काय करी " या उक्तीप्रमाणे संपूर्ण पालकांच्या सहभागाने आज गाव स्वच्छ करण्यात आला. स्वच्छ गाव निर्मळ गाव ही संकल्पना शाळेतील शिक्षक व ग्रामस्थांनी राबवली.शाळा व्यवस्थापन अध्यक्ष सुकन्या दुकले यांनी श्रीफळ वाढवून कार्यक्रमाची सुरुवात केली. सरपंच चोरढे तृप्ती घाग , शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुकन्या दुकले, ऋतिक घाग , संदीप घाग,रवींद्र भोपी, सुरेश तांबडे, सुनील घाग, लक्ष्मण काचारे, हेमंत दूकले, नितेश घाग, प्रमोद चोरढेकर, वैष्णवी आमलिकर, माधुरी शेडगे, मीनाक्षी घाग, गंगाराम भोईर, जनी पाटील, विद्या शेडगे,स्वाती टावरी, रेणुका घाग, जयश्री पंची, हिरा भोईर आदी ग्रामस्थांनी सहकार्य केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक संगीता भगत, विजय जाधव, राजेंद्र नाईक, रमेश सुभेदार, प्रतिभा वर्तक, इर्शाद बैरागदार, जयश्री पंची यांनी विशेष परिश्रम घेतले.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या