कोर्लई,ता.१ (राजीव नेवासेकर)मुरुड शहरापासून अवघ्या पाच कि.मी.अंतरावर असलेल्या विहूर ग्रामपंचायत हद्दीतील विहूर, बौद्धवाडी व मोरा या गावांना अद्याप मोबाईल टॉवर नसल्याने अनेक सुविधांपासून वंचित राहावे लागत असून या परिसरात लवकरात लवकर मोबाईल टॉवरची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी.अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
विहूर ग्रामपंचायत हद्दितील विहूरसह बौद्ध वाडी आणि मोरा या गावांची सुमारे तीन हजार लोकसंख्या आहे. या परिसरात बाहेरून आलेल्या सुमारे चार पाचशे लोकांची वस्ती आहे. प्रत्येक घरामध्ये चार-चार, पाच-पाच, आठ-आठ मोबाईल आहेत. पण मोबाईल असुनही ग्रामस्थांना नेटवर्क अभावी वंचित राहावे लागत आहे. सर्व शैक्षणिक संस्था ऑनलाईन अभ्यास घेत असल्या कारणाने यामुळे विद्यार्थ्यांचे देखील शैक्षणिक नुकसान होत आहे.
आजच्या या धावत्या युगामध्ये मोबाईल ही काळाची गरज असून जीवनातील अत्यावश्यक घटक बनले आहे. या परिसरात अनेक शैक्षणिक संस्था, शिक्षक, डॉक्टर, शासकीय, निमशासकीय, खाजगी कार्यालय व कर्मचारी आहेत. तसेच हॉटेल रिसॉर्ट सुद्धा आहेत या ठिकाणी पर्यटकांची येजा असते, या ठिकाणी पेट्रोल पंप सुद्धा आहे. त्यामुळे या परिसरात बाहेरून येणारे पर्यटक तसेच स्थानिक ग्रामस्थांना, मुरुड मधील नागरिकांना मोबाईल टॉवर नसल्याने खुप मोठ्या प्रमाणात असुविधा होत आहे.
मोबाईल कंपन्यांनी विहूर परिसरात लक्ष देऊन टाॅवर उभारावे जेणेकरून मोबाईल असुनही नेटवर्क पासून ग्रामस्थांना वंचित राहणार नाही व असुविधा होणार नाहीत. व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, पर्यटकांना सुद्धा सुविधा मिळतील... डाॅ. नबील उलडे, हिजामा सेंटर, विहूर
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या