कोर्लई,ता.२(राजीव नेवासेकर)लायन्स क्लब इंटरनॅशनल तर्फे दरवर्षी ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात १ ऑक्टोबर ते ७ ऑक्टोबर या कालावधीत सर्व्हिस वीक म्हणून समाजपयोगी विविध उपक्रम राबविण्यात येतात.याचाच भाग २ ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्ताने लायन्स क्लब ऑफ श्रीबाग सेंटेनिअल अध्यक्ष अध्यक्ष ॲड .डॉ. के.डी. पाटील, लायन्स क्लबचे रिजनल चेअरपर्सन लायन वनगे यांच्या मार्गदर्शनाखाली अलिबाग समुद्र किनाऱ्यावर स्वच्छता अभियान राबविण्यात आले
यावर्षी लायन्स क्लब ऑफ श्रीबागतर्फे पर्यावरण, गरजुंना अन्नदान, युवा सुरक्षा, वृद्धांसाठी व्याखाने, स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, आरोग्य तपासणी यासारखे विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. आज दि. २ ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त क्लबचे लायन्स क्लब ऑफ श्रीबाग सेंटेनिअल अध्यक्ष अध्यक्ष ॲड .डॉ. के.डी. पाटील, लायन्स क्लबचे रिजनल चेअरपर्सन लायन वनगे यांच्या मार्गदर्शनाखाली अलिबाग समुद्र किनाऱ्यावर स्वच्छता अभियान राबविण्यात आले. हे अभियान यशस्वी करण्यासाठी लायन्स ऑफ श्रीबाग चे लायन्स अंकित बंगेरा, श्रीकांत पाटील, डॉ साजिद शेख, गायकवाड सर, पी.एन. पाटील,भोसले, व इतर लायन्स मोठ्यासंख्येने उपस्थित होते. या अभियान दरम्यान पी.एन.पी.महाविद्यालयचे कार्यक्रम अधिकारी प्रा.मिलिंद घाटगे राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थ्यांसह या अभियानात सहभागी झाले होते.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या