Type Here to Get Search Results !

डॉ.जयपाल पाटील यांचे आपत्ती व सुरक्षा वरील ५६५ वे व्याख्यान

कोर्लई,ता.३(राजीव नेवासेकर)सार्वजनिक वाचनालय आणि जिल्हा ग्रंथालय अलिबाग रायगड यांच्यातर्फे सालाबाद प्रमाणे यंदाही सार्वजनिक वाचनालय येथे शारदोत्सव कार्यक्रमाचे आयोजन अध्यक्ष सौ.शैला प्रमोद पाटील यांनी केले आहे.यामध्ये गुरुवार दिनांक 3 रोजी १२ वाजता शारदा देवीची प्रतिष्ठापना होणार असून श्री पंत महाराज प्रासादिक भजन सायंकाळी ६ते ७.३०ते वेळेत श्रीपंत महाराज प्रासादिक भजन मंडळ कार्ले यांचे आहे.शुक्रवार दिनांक 4 /10 /24 रोजी सायंकाळी ५ ते  ७.३०पर्यंत आपत्ती व्यवस्थापन तज्ञ डॉ. जयपाल पाटील यांचे माझे कुटुंब व त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी हे व्याख्यान होणार आहे.शनिवार दिनांक ५ रोजी सायंकाळी ५ ते ७ पर्यंत को.म.सा.प. अभिवाचन, रविवार दिनांक 6 रोजी सायंकाळी ५ ते ७ पर्यंत करओके स्पर्धा, सोमवार दिनांक ७ रोजी सायंकाळी५  ते ७ वाजेपर्यंत हळदी कुंकू समारंभ, श्री अनंत नाद प्रस्तुत अभंग व भक्ती गीतांचा कार्यक्रम होणार आहे. मंगळवार दिनांक ८ रोजी सकाळी १० ते  १२पर्यंत चित्रकला स्पर्धा, सायंकाळी ५  ते ७ स्वरगंधार  कुमार गंधार म्हात्रे यांची संगीत मैफल, बुधवार दिनांक  ९ रोजी सायंकाळी ४ ते ७ पर्यंत महिलांकरता भोंडला कार्यक्रम असुन गुरुवार दिनांक१०  रोजी सकाळी १० ते १२ पर्यंत निबंध स्पर्धा, इयत्ता ५वी ते ७वी सायंकाळी ५ ते ७वाजेपर्यंत भावपूर्ण देशमुख यांचेशुक्रवार दिनांक 11 रोजी सायंकाळी  ५ ते ७ ज्येष्ठ नागरिक यांचे कार्यक्रम शनिवार दिनांक 12 रोजी सकाळी १० वाजता संस्थेचा 107 वा वर्धापन दिन व बक्षीस समारंभ संस्थेचे अध्यक्ष अँड. गौतम पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे.असे वाचनालयाचे ग्रंथपाल भालचंद्र वर्तक यांनी कळविले आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad

फॉलोअर