कोर्लई,ता.२८(राजीव नेवासेकर)केरळ येथे दिनांक २७ रोजी संपन्न झालेल्या मास्टर्स कप २०२४ या राष्ट्रीय कराटे स्पर्धेत छत्रपती शिवाजी नूतन विद्यालयच्या विद्यार्थ्यानी चमकदार कामगिरी करून दोन रजत, चार कांस्यपदके पटकावले. यात मजगावचे ध्रुव कळके, रेश्मा भोईर आणि काव्या यांचा समावेश आहे.
"मास्टर्स कप २०२४" ही राष्ट्रीय कराटे स्पर्धा नुकत्याच केरळ राज्यात वायनाड जिल्ह्यातील सुलतान बत्तेरी येथे संपन्न झाली. यात महाराष्ट्रातील सात कराटेपट्टूची निवड करण्यात आली होती. महाराष्ट्राने चमकदार कामगिरी करत दोन सुवर्ण, दोन रजत आणि नऊ कांस्य पदके पटकावली. यात छत्रपती शिवाजी नूतन विद्यालयात शिकणारे ध्रुव कळके कळके (मजगाव), रेश्मा भोईर (मजगाव), काव्या नाक्ती (खार मजगाव) यांचा देखील समावेश आहे. सर्व कराटेपट्टूंना आंतरराष्ट्रीय पंच क्योशी- विजय चंद्रकांत तांबडकर यांच्या अध्यक्षतेखाली प्रशिक्षक रेन्शी - अभिषेक गजानन तांबडकर व सेन्सई - आकांक्षा विजय तांबडकर यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या या यशानंतर शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्याकडून अभिनंदनाचा वर्षाव होत असून गावात सर्वत्र तिचे कौतुक होत आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या