कोर्लई,ता.२८(राजीव नेवासेकर) शेतकरी कामगार पक्षाच्या अलिबाग -मुरुड मतदार संघाच्या उमेदवार चित्रलेखा पाटील यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून मुरुड तालुक्यातील नांदगाव ग्रामपंचायत हद्दीतील दांडा ग्रामस्थ व महिलांनी शेतकरी कामगार पक्षात जाहीर पक्षप्रवेश केला.
शेतकरी कामगार पक्षाच्या अधिकृत उमेदवार चित्रलेखा पाटील उर्फ चिऊताई यांची उमेदवारी जाहीर झाल्यापासून त्यांनी प्रचार दौरा सुरु केला आहे. रविवारी कुडूससह पोयनाड परिसरात त्यांचा दौरा असणार असल्याची माहिती कार्यकर्त्यांनी दिली. अलिबाग, मुरूड, रोहा विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चित्रलेखा पाटील यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे.काल मुरुड तालुक्यातील नांदगाव ग्रामपंचायत हद्दीतील दांडा येथील ग्रामस्थ व महिलांनी शेतकरी कामगार पक्षात जाहीर पक्षप्रवेश केला.अलिबाग -मुरुड मतदार संघाच्या शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवार चित्रलेखा पाटील यांनी सर्व पक्षप्रवेश कर्त्यांचे स्वागत केले असून आगामी होणा-या विधानसभा निवडणुकीत याचा निश्चितच चांगला परिणाम दिसून येईल.असे सांगितले.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या