Type Here to Get Search Results !

संदीप घरत यांनी दिले सहाफुटी धामण सर्पाला जिवदान !



कोर्लई,ता.२३(राजीव नेवासेकर) मुरुडच्या बाजारपेठेतील भंडारवाडा येथील प्रशांत कासेकर यांच्या घराच्या मागील वाडीत जाळ्यामध्ये रात्रभर अडकून पडलेल्या पाच फुटी धामण जातीच्या सापाला सर्पमित्र संदीप घरत यांनी आपल्या कौशल्याने पकडून वनखात्याच्या सहकार्याने जवळील जंगलामध्ये सोडून देण्यात आल्याबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. 

        सकाळी मांजरीने गोंगाट घातल्यानंतर जाळ्यामध्ये अडकलेली धामण निदर्शनास आली. तात्काळ कासेकर यांनी सर्पमित्र संदीप घरत यांच्याशी संपर्क साधला व वनखात्यालाही पाचरण करण्यात आले. यावेळी वनरक्षक किरण गायकर, वनपाल राहुल कुलकर्णी यांच्या निरीक्षणाखाली जाळ्यातून धामण जातीच्या सापाला सुखरूप सोडवण्यात आले. 

        जाळ्यामध्ये अडकल्याने स्वतःची सुटका करून घेताना ही धामण जखमी झालेली होती, जर ही लक्षात आली नसती तर त्या धामण सर्पाला जीव गमावा लागला असता. कासेकर यांच्या प्रसंग सावधानतेमुळे या धामण जातीच्या सर्पाचा जीव वाचला आहे.असे सर्पमित्र संदीप घरत यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad

फॉलोअर