या आठवड्याभरात मुरुड आगाराच्या तीन गाड्यांमध्ये रस्त्यामध्ये बिघाड होऊन बंद पडल्याने प्रवासी वर्गांचे मोठे हाल झाले आहेत. त्यामुळे आता मुरुड आगाराला घरघर लागली की काय?अशी शंका निर्माण होत आहे. रस्त्यात गाड्या बंद पडण्याच्या प्रमाणात वाढ झाल्याने एक प्रकारची शृंखलाच सुरू झाल्याचे दिसून येत आहे.
१५ ऑक्टोंबर रोजी मुरुड आगाराची मुरुड-स्वारगेट गाडी रेवदंडा परिसरात मागील टायर पंचर झाल्याने वाहन चालकाने कशीबशी गाडी अलिबाग आगारात पर्यंत पोहोचवली होती. त्यानंतर १७ ऑक्टोंबर रोजी मुरुड-बोरवली गाडी बोर्ली मांडला येथे गाडी पंचर झाल्याने प्रवाशांना तेथेच उतरावे लागले होते. सदर दोन्ही पंचर गाड्यांमध्ये स्टेफनी नसल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल झाले होते. या दोन्ही घटना ताज्या असताना मुरुड महाड गाडी २३ ऑक्टोंबर रोजी सकाळी निघाली ही गाडी सीएनजी होती ही गाडी चोरढे सावरोली सोडल्यानंतर तळेखार जवळ येताच अचानक या गाडीतून धूर येऊ लागला, गाडीमध्ये सर्वत्र धूरच धूर झाल्याने एसटी तील प्रवासी घाबरले ड्रायव्हरने तात्काळ गाडी साईडला थांबवली त्यानंतर सर्व प्रवासी खाली उतरले कोणालाही दुखापत झाली नाही.
महिन्याभरापूर्वी रेवदंडा परिसरात अशाच मुरुड सीएनजी गाडीचे बिघाड झाले होते या गाडीतून धूर निघाला होता. सदर सीएनजी गाड्यांचे मेकॅनिक अलिबाग मुरुड आगारात उपलब्ध नसल्याने दुरुस्तीसाठी अडचण येत आहे. असा किती प्रवाशांनी त्रास सहन करायचा जर सीएनजी गाडी दिली तर त्यांचे मेकॅनिक सुद्धा द्यावेत व गाड्या पूर्णपणे तपासल्याशिवाय सोडूच नये जेणेकरून प्रवाशांचे रस्त्यामध्ये गाड्या बिघड झाल्यानंतर हाल होणार नाहीत अशी मागणी प्रवासी वर्गातून होत आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या