रायगड,दि.५(जिमाका):- शासन, महसूल व वन विभागाकडील दिनांक 23 जानेवारी 2019 शासन निर्णयान्वये गौण खनिजाच्या खनिपट्टयासाठी ई-ऑक्शन पध्दतीने लिलाव करण्याची कार्यपध्दती विहित करण्यात आली आहे. त्यानुसार मौजे वळक, ता. पेण येथील स.नं. 23/0, एकूण क्षेत्र 6-60 हे.आर. या शासकीय जमिनीतील (भाग-अ) एकूण क्षेत्र 6-60 हे.आर. पैकी क्षेत्र 3-10 हे.आर. आणि (भाग-ब) एकूण क्षेत्र 6-60 हे.आर. पैकी क्षेत्र 3-50 हे.आर. याप्रमाणे खाणकाम योग्य चिन्हांकित क्षेत्राचा भूविज्ञानकीय तांत्रिक अहवाल तयार करण्याकामी नियुक्ती करणे आवश्यक आहे.
त्याअनुषंगाने भूविज्ञानकीय तांत्रिक अहवाल कामकाज करण्याकामी येणाऱ्या खर्चाबाबत विविध पात्र इच्छुक कंपनी/संस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालय रायगड अलिबाग (खनिकर्म शाखा) येथे तसेच ई-मेल आयडी raigaddmo003@gmail.com यावर दि.07 ऑक्टोबर 2024 रोजी कार्यालयीन वेळेपर्यंत दरपत्रक सादर करावेत. तसेच सदरची माहिती www.raigad.gov.in या संकेतस्थळावर (वेबसाईटवर) उपलब्ध करुन देण्यात आली आहे, असे अपर जिल्हाधिकारी सुनिल थोरवे यांनी कळविले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या