Type Here to Get Search Results !

निवडणूक आचारसंहिता भंगाच्या तक्रारीसाठी टोल फ्री क्रमांक




रायगड,दि.18(जिमाका):- विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता भंगाच्या तक्रारीसाठी जिल्हा निवडणूक प्रशासनातर्फे टोलफ्री संपर्क क्रमांक उपलब्ध करुन देण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी श्री.किशन जावळे यांनी दिली.


भारत निवडणूक आयोगाने विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून निवडणूक आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी तात्काळ सुरू झाली आहे. नागरिकांना आचार संहिता भंगाच्या तक्रारी करावयाच्या असल्यास त्यांनी 18002330102 आणि 1950 टोल फ्री क्रमांकावर नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा. या कक्षाद्वारे तातडीने तक्रारीची दखल घेण्यात येईल. हा कक्ष 24 तास सुरू राहणार असून त्यासाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad

फॉलोअर