Type Here to Get Search Results !

संदीप घरत यांनी दिले पाचफुटी नागाला जिवदान !

कोर्लई,ता.१३(राजीव नेवासेकर) मुरुड तालुक्यातील खारआंबोली येथील रहिवासी संदीप ठाकूर यांच्या घरी आढळून आलेल्या पाचफुटी नागाला सर्पमित्र संदीप यांनी वनविभागाचे अधिकारी मनोज वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक किरण गायकर यांच्या सहकार्याने, आपल्या कौशल्याने पकडून जवळील जंगलात सुरक्षितपणे सोडून जिवदान दिल्याबद्दल सर्वत्र कौतुक व्यक्त केले जात आहे.

 खारआंबोली येथील रहिवासी संदीप ठाकूर यांच्या घरामध्ये साप आढळून येताच घबराट पसरली होती, त्यांनी तातडीने वनविभागाचे वनपाल किरण गायकर यांच्याशी संपर्क साधला असता किरण गायकर यांनी लगेच सर्पमित्र संदीप यांना भ्रमणध्वनीद्वारे खबर देताच संदीप घरत यांनी खारआंबोली येथील संदीप ठाकूर यांच्या घरी येऊन पाच फुटी नागाला आपल्या कौशल्याने पकडून वनअधिकारी मनोज वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक किरण गायकर यांच्या सहकार्याने जवळील जंगलात सुरक्षितपणे सोडून जिवदान दिल्याबद्दल सर्वत्र कौतुक व्यक्त केले जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad

फॉलोअर