कोर्लई,ता.१०(राजीव नेवासेकर)मुरुड-रोहा प्रवासात जवळचा मार्ग असलेल्या मुरुड तालुक्यातील सुपेगांव रस्त्यालगत अनेक ठिकाणी असलेला झाडाझुडपांचा विळखा अपघाताला आमंत्रण ठरत असून याकडे संबंधित संबंधित बांधकाम खात्याचे दुर्लक्ष असल्याबाबत पर्यटक, प्रवासी, वाहनचालक व नागरिकांतून नाराजी व्यक्त होत असून साईडपट्ट्या साफ करण्याची मागणी केली जात आहे.अपघातानंतरच संबंधित बांधकाम खात्याला जाग येणार काय ? असा सवाल प्रवासी व वाहनचालकांकडून विचारला जात आहे.
मुरुड-जंजिरा पर्यटनात रत्नागिरी, पुणे, कोल्हापूर अन्य ठिकाणाहून काशिद-बिच, फणसाड अभयारण्य, मुरुड-जंजिरा किल्ला पाहाण्यासाठी रोहा सुपेगांव मार्गे मुरुड रस्ता जवळ असल्याने या रस्त्यावर वाहनांची वाढती वर्दळ असते. मागील महिन्यापासून या रस्त्यालगत ब-याच ठिकाणी झाडाझुडपांचा विळखा असून काही ठिकाणी रस्त्यावर झाडे झुकलेल्या अवस्थेत आहेत तर काही फांद्या अवजड वाहनांना लागून तुटून अक्षरशः लोंबकळताहेत.काही वळणात समोरून येणारे वाहन दिसत नसल्याने वेळप्रसंगी अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.
शासनाच्या संबंधित बांधकाम विभागाने यात लक्ष पुरवून सुपेगांव रस्त्यालगत असलेला झाडाझुडपांचा विळखा हटविण्यात यावा. अशी मागणी पर्यटक, प्रवासी, वाहनचालक व नागरिकांतून जोर धरीत आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या