कोर्लई,ता.७(राजीव नेवासेकर) श्री गणरायाचे आगमन अवघ्या काही तासांत असताना मुरुड तालुक्यातील साळाव -चोरढे रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात येऊन पुन्हा जैसे थे अवस्था झाल्याने अखेर या रस्त्यावरील बाप्पाचा प्रवास खडतर झाल्याने सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कामाबाबत गणेश भक्तांकडून नाराजीचा सूर दिसून येत आहे.
साळाव-रोहा मार्गावरअनेक दिवसांपासून साळाव,चेहेर,वाघुळवाडी,आमली,येसदे, शिरगाव, वळके,सातिर्डे,चोरढे रस्त्यावर पडलेले खड्डे श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दगड माती टाकून बुजविण्यात आले होते.दरम्यानच्या काळात पावसाने पुन्हा याठिकाणी जैसे थे अवस्था झाल्याने सार्वजनिक बांधकाम खात्याने बुजविण्यात आलेले खड्डे वरवरची मलमपट्टी ठरली ! या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अखेर बाप्पाचा प्रवास खडतर झाल्याने श्रीगणेश भक्तांकडून नाराजीचा सूर दिसून येत आहे.
आमच्या प्रतिनिधीने मुरुड सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपअभियंता रमेश गोरे यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता, मी वैद्यकीय (मेडिकल) रजेवर आहे.तुम्हाला बातमीत काय टाकायचे ते टाका असे सांगितले. येथील उपअभियंता रमेश गोरे यांचा सेवानिवृत्ती कालावधी जवळ आला असल्याचे व ते कार्यालयात अनेकवेळा भेटत नसल्याने त्यांना सेवानिवृत्ती पर्यंत अन्य ठिकाणी बदली किंवा रजेवर पाठविण्यात यावे व याठिकाणी नवीन उपअभियंता यांना संधी देण्यात यावी.अशी भावना जनमानसातून व्यक्त केली जात आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या