Type Here to Get Search Results !

स्व. विनायक मेटे यांना उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार प्रदान : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याहस्ते डॉ. ज्योती मेटे यांनी स्विकारला पुरस्कार


कोर्लई,ता.४(राजीव नेवासेकर)लोकनेते स्व. विनायकराव मेटे यांना आज विधिमंडळात आयोजित कार्यक्रमात देशाच्या राष्ट्रपती द्रोपदी मुर्म यांच्या हस्ते शिवसंग्रामच्या अध्यक्षा आदरणीय डॉ.ज्योतीताई विनायकराव मेटे यांच्या माध्यमातून उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस,उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात आला. 

       याप्रसंगी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री महोदय, सभापती व अन्य मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.विधिमंडळात पुरस्काराची घोषणा होताच टाळ्यांचा कडकडाट सुरू झाला आणि गेल्या 27 वर्ष सलग विधिमंडळात वंचित, उपेक्षित व सर्वसामान्यांच्या प्रश्नाचा निपटारा करण्यासाठी प्रयत्न करणारे साहेबांचे चलचित्रच डोळ्यासमोर उभे राहिले.

    शिवसंग्रामच्या अध्यक्षा ज्योतीताई मेटे यांनी स्व.विनायकराव मेटे यांना देण्यात येणारे सन्मानपत्र व पुरस्कार प्राप्त केल्यानंतर राज्यभरातून शिवसंग्रामचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रत्यक्षात मुंबई येथे येऊन  शुभेच्छा दिल्या. यामध्ये रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश सावंत, सरचिटणीस आप्पा सत्वे, कोषाध्यक्ष राम जगदाळे, मार्गदर्शक एस. एन. पाटील, भिवंडीचे जिल्हाध्यक्ष इंद्रजीत घाडगे, दिंडोशी शिवसंग्रामचे  प्रमुख राम भोईटे, दिंडोशी तालुका अध्यक्ष राम घोरपडे, सोशल मीडियाचे क्रिश सिंह, ठाणे जिल्हा शिवसंग्रामचे सुंदर मस्के, बालाजी जाधव, रणजीत राऊत, संभाजी भोसले, लक्ष्मण घाडगे, अनिल भोसले, पुणे जिल्हा शिवसंग्रामचे भरतजी लगड, चेतन भालेराव व अन्य शिवसंग्राम पदाधिकारी कार्यकर्ते याप्रसंगी उपस्थित होते तसेच शिवसंग्रामचे युवा नेतृत्व मा.आशुतोष भैय्या मेटे यांनी शिवसंग्रामचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे स्वागत केले व मेटे कुटुंबीयांच्या सुखदुःखात सहभागी होत असल्याबद्दल यावेळी सर्वांचे आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad

फॉलोअर