कोर्लई,ता.४(राजीव नेवासेकर) मुरुड तालुक्यातील बोर्ली येथील भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते संदीप भालचंद्र चिरायू यांची मुरुड तालुका सरचिटणीसपदी नियुक्ती झाल्याबद्दल सर्वत्र कौतुक व अभिनंदन केले जात आहे.
भारतीय जनता पार्टीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत तालुका अध्यक्ष शैलेश काते यांनी दिलेल्या नियुक्ती पत्रात म्हटले आहे कि,पक्षातील आपले योगदान लक्षात घेऊन मुरुड तालुका सरचिटणीस पदी आपली नियुक्ती करणेत येत आहे.
भारतीय जनता पार्टीचे आपले प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. रविंद्रजी चव्हाण साहेब, लोकसभा प्रमुख सतीशजी धारप साहेब, आमदार प्रशांत ठाकूर,आमदार रवीशेठ पाटील,दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष खासदार धर्यशील पाटील व सर्व सरचिटणीस, उपाध्यक्ष व पदाधिकारी यांना अभिप्रेत असणारे पक्षकार्य आपले हातून घडेल याबद्दल मला विश्वास आहे. या नव्या जबाबदारी साठी आपणास मनस्वी शुभेच्छा !आपला स्रेह व सहकार्य सदैव अपेक्षीत असल्याचे तालुका अध्यक्ष शैलेश काते यांनी दिलेल्या नियुक्ती पत्रात म्हटले आहे.संदीप चिरायू यांची मुरुड तालुका सरचिटणीसपदी नियुक्ती झाल्याबद्दल आप्तेष्ट नातेवाईक मित्र परिवार, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अभिनंदन करुन पुढील यशस्वी कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या