कोर्लई,ता.१८ (राजीव नेवासेकर)मुरुड बीच व एकदरा खाडीतून सुमारे ८३ प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या गणपतीचे श्रीसदस्यांनी पुनर्विसर्जन केले. पहाटे पाच वाजल्यापासून सुमारे २५ ते ३० श्रीसदस्यांनी खाडीमध्ये विसर्जित केलेले प्लास्टर ऑफ पॅरिसचे गणपती काढण्यास सुरुवात केली. दोन तासाच्या अथक प्रयत्नाने मुरुड बीच व एकदरा खाडीतून ८५ प्लास्टर ऑफ पॅरिसचे गणपतीच्या मूर्ती मिळाल्या आहेत.
बैठकीच्या माध्यमातून मुरुड मधील श्रीसदस्य दरवर्षी या खाडीतील प्लास्टर ऑफ पॅरिसचे गणपती काढून खोल समुद्रात नेऊन विसर्जित करीत आहेत. याही वेळेला हे गणपती काढण्यात आले हे सर्व गणपती बोटीच्या साहाय्याने परिसरातील खोल समुद्रात नेऊन विसर्जन करण्यात आले. मुरुड बीच व एकदरा खाडी उथळ असल्याकारणाने पाण्याच्या ओटीला हे सर्व गणपती वरती येत असतात या मूर्तींचे विटंबना होऊ नये या उद्देशाने हे श्रीसदस्य ही सेवा करीत असतात.
शाडू माती पासून तयार होणाऱ्या मूर्ती महाग असल्या कारणाने प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींची मागणी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. मातीच्या मूर्ती काही तासातच विरघळतात तर शाडू मातीच्या मूर्ती विरघळण्यासाठी ४८ तासांचा कालावधी लागतो. त्यामुळे बैठकीच्या माध्यमातून नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे श्रीसदस्यांनी शाडू मातीच्या मूर्ती आणाव्यात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती आणू नयेत असे आवाहन करण्यात आले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या