कोर्लई,ता.१९(राजीव नेवासेकर) मुरुड मधील अंजुमन इस्लाम जंजिरा ही एक जुनी शैक्षणिक संस्था असुन संस्थेमार्फत विद्यार्थ्यांना दर्जेदार पदवी शिक्षण देण्याचे कार्य सन २००९ पासुन अंजुमन इस्लाम जंजिरा डिग्री कॉलेज ऑफ सायन्स मार्फत करण्यात येत आहे.
यु.जी.सी संचलित नॅशनल असेसमेंट अँन्ड अँक्रिडिएशन काऊंसिल (नॅक) द्वारे महाविद्यालयाचा शैक्षणिक दर्जा तसेच विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या सोयी सुविधा याची तपासणी करण्यात येते. तदनंतर महाविद्यालयास उचित मानांकन देण्यात येते.
या महाविद्यालयास प्रथम २०१९ साली बी (२.३५ सी.जी.पी.ए) मानांकन प्राप्त झाले होते. यानंतर पाच वर्षांनी पुनः पडताळणी नॅकद्वारे दिनांक ०३ सप्टेंबर व ०४ सप्टेंबर २०२४ रोजी संपन्न झाली. यासाठी नॅक पिअर टीम मध्ये डॉ. के.एम. अबूबकर, चेअरमन डॉ. बुधीन गोगई, समन्वयक व डॉ. तरंजीत सूद, सदस्य म्हणून लाभले होते.
महाविद्यालयाची पाहणी व सर्व बाबींची पडताळणी करून नॅक द्वारे या महाविद्यालयास बी प्लस (२.६९ सी.जी.पी.ए) मानांकन प्राप्त झाले आहे. महाविद्यालयाच्या या घवघवीत यशा मध्ये समाजातील सर्वच घटकांचा समावेश आहे. सर्व स्तरातुन या यशाबद्दल महाविद्यालयाचे अभिनंदन करण्यात येत आहे.
हे यश संपादन करण्यामध्ये महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन जैनुद्दीन कादीरी, सदस्यांमध्ये इम्रान मलिक, तौसिफ़ फत्ते, इस्माईल शेख तसेच संस्थेचे अध्यक्ष अजीम खानझादा, सचिव हिफझुरेहमान नाझीरी, सहसचिव अ. रहीम कबले, खजिनदार अल्ताफ मलिक व सर्वच विश्वस्तांचे मोलाचे सहकार्य लाभले.
महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. साजिद शेख यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. अमानुल्लाह पठाण, समन्वयक अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग, विदयार्थी व पालक यांच्या सहकार्याने महाविद्यालयास हे मानांकन प्राप्त करणे शक्य झाले आहे. या निमित्त सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या