कोर्लई,ता.१८(राजीव नेवासेकर) गेल्या अनेक वर्षांपासून विशेष करून पावसाळ्यात संपूर्ण जिल्ह्यात तसेच मुरुड तालुक्यात रस्त्यावर विविध ठिकाणी मोकाट गुरांच्या त्रासाने प्रवासी व वाहनचालक त्रस्त झाले असून यावर ठोस उपाययोजना करण्यात प्रशासनाची हतबलता, उदासीनता दिसून येत असल्याने जनमानसातून नाराजीचा सूर दिसून येत आहे.
नगरपरिषद, ग्रामपंचायतीत पुर्वी असलेली कोंडवाडा संकल्पना संपुष्टात येऊन कालबाह्य झाल्याने जिल्ह्यात तसेच मुरुड तालुक्यात अनेक रस्त्यावर ब-याच ठिकाणी उनाड गुरांचा कळप, ठिय्या पाहावयास मिळतो.रस्त्यावर उनाड गुरांच्या त्रासाने टू -व्हीलर, थ्री -व्हीलर वाहन चालकांना वेळप्रसंगी अपघाताला सामोरे जावे लागते.यामुळे कोणत्याही क्षणी अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा व उपाययोजना ही काळाची गरज आहे.
यासाठी शासनाच्या विविध विभागाने तसेच नगरपरिषद व ग्रामपंचायत प्रशासनाने जातीने लक्ष पुरवून रस्त्यांवरील उनाड गुरांच्या समस्येवर ठोस उपाययोजना करण्याची मागणी वाहनचालकांकडून व जनमानसातून होत आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या