कोर्लई,ता.४(राजीव नेवासेकर) मुरुड तालुक्यातील बोर्ली -मांडला परीसरातील नव उद्योजक सामाजिक कार्यकर्ते विकास मारुती कातुर्डे यांना महाराष्ट्र उद्योग गौरव पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.त्यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल सर्वत्र कौतुक व अभिनंदन केले जात आहे.
रिअल इस्टेट क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या उद्योजकांना स्विफ्ट निफ्ट या पुणे येथील संस्थेतर्फे दरवर्षी हा पुरस्कार देण्यात येतो.संस्थेच्या नुकत्याच ठाणे येथे झालेल्या एका कार्यक्रमात विकास कातुर्डे यांनी रिअल इस्टेट क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल महाराष्ट्र उद्योग गौरव पुरस्कार -२०२४ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश साबे मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व चषक देऊन सन्मानित करण्यात आले.
आपल्याला महाराष्ट्र उद्योग गौरव पुरस्कार -२०२४ मिळाल्याबद्दल विकास कातुर्डे यांनी समाधान व्यक्त केले असून सामाजिक व उद्योग क्षेत्रात सातत्याने कार्यरत राहून आपले मोलाचे योगदान राहील.अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल आप्तेष्ट,नातेवाईक,मित्र परिवार तसेच विविध क्षेत्रातून अभिनंदन व कौतुक केले जात आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या