सुरुवातीला सर्व उपस्थितांचे स्वागत करण्यात येऊन कार्यक्रमाचे अध्यक्ष आयु.जनार्दन हाटे यांच्या शुभहस्ते धम्म ध्वजारोहण करण्यात आले.बौद्धाचार्य जीवन मोरे यांनी खमंग याचना देऊन आदरणीय भंते प्रज्ञानंद थेरो यांनी वंदन,त्रिसरण,गाथा पंचशील व बुद्ध धम्माच्या रितीरिवाजा प्रमाणे वंदनेस सुरुवात केली.
यावेळी आंबोली गांव मंडळाकडून आदरणीय भंते यांना भोजनदान,चिवरदान,परिष्कदान करण्यात आले.यावेळी देहुबाई चा.कांबळे व प्रणिता प. मोरे यांना दोन मिनिटे स्तब्धता पाळून भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.
यावेळी वर्षावास म्हणजे पुण्यकर्म करण्याची सुवर्ण संधी आणि धम्म देसना श्रवण केल्याने कोणते लाभ होतात यावर सुमधुर वाणीने प्रवचन करण्यात आले.
मुरुड तालुका बौद्ध समाजसेवा संघ शाखा क्र.१ व शाखा क्र.३ अध्यक्ष नामदेव गायकवाड व अध्यक्ष जनार्दन शिंदे यांच्याहस्ते भगवान गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.
मुरुड तालुका बौद्ध समाजसेवा संघाचे माजी अध्यक्ष नारायण दुधे, प्रवीण मोरे, विजय मोरे,रुपेश मोरे,सचीन हाटे, सुधीर हाटे, विलास कोंजिरकर, काशिनाथ कांबळे, रमेश मोरे, पांडुरंग जाधव, बाळकृष्ण मोरे, कनिष्ठ दाभणे,सचीन शिंदे,उमेश शिंदे,तेजस मोरे, आकाश चव्हाण यांनी आदरणीय भंते यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले तर मोरे सर,विक्रम काबळे,अकबर पठाण, अनंत पाडगे,सलिम खान, निकिता कोंजिरकर, मेघना हाटे, कुसूम मोरे,कमल मोरे,विमल मोरे, सुरेखा तांबे, वंदना मोरे,जिविता मोरे, कांबळे मॅडम, जाधव मॅडम चंद्रकांत शिंदे, कमलेश कांबळे, दिपक मोरे, महादेव मोरे,गौतम मोरे, योगेश मोरे,दामिनी हाटे,चंदना मोरे,तनुजा मोरे, जान्हवी मोरे, जुई मोरे मान्यवरांचा देखील पुष्पगुच्छ देऊन यावेळी सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन नितीन कोंजिरकर, अशोक कांबळे यांनी तर महेश हाटे यांनी आभार मानले.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या