कोर्लई,ता.२०(राजीव नेवासेकर)महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना त्यांच्या सुरक्षेसाठी महिला कायद्याची ओळख व्हावी तसेच शासना मार्फत देण्यात येणाऱ्या विविध शिष्यवृत्तीची माहिती करून देण्यासाठी अंजुमन इस्लाम जंजिरा डिग्री कॉलेज ऑफ सायन्स मुरुड जंजिरा येथे महिला विकास कक्ष व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने ‘’महिला सुरक्षितता व शिष्यवृत्ती’’ या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आज दिनांक २० सप्टेंबर २०२४ रोजी आयोजन करण्यात आले होते.
या कार्यशाळेचे आयोजन महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. साजिद शेख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. त्यांनी आपल्या भाषणातून विदयापीठ अनुदान आयोग व शासना मार्फत महिलांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपाययोजना बद्दल माहिती दिली. या कार्यशाळेसाठी विधीतज्ञ अँड. विक्रांत पाटील, वकील जिल्हा सत्र न्यायालय, अलिबाग रायगड यांना प्राचारण करण्यात आले त्यांनी महिला सुरक्षा कायद्यांची माहिती विद्यार्थिनींना करून दिली. नवाब शेख शिष्यवृत्ती, नोडल अधिकारी यांनी विद्यार्थिनींना शासनाच्या विविध शिष्यवृत्तीची माहिती करून दिली.
या कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रा. गोऱमे निदा यांनी केले ही कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी महिला विकास कक्ष प्रमुख डॉ. स्वाती खराडे, ग्रंथपाल अंजुम दाखवे व छापेकर अमरीन, सुर्वे फातिमा, घारे हुमेरा, कलबसकर अरफा, कागदी मदिहा, ठाकूर रिया यांनी अथक परिश्रम घेतले.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या